Iran Tensions : तेल टंचाईसाठी अमेरिका १७२ बॅरल तेल बाजारात आणणार

Iran Tensions : तेल टंचाईसाठी अमेरिका १७२ बॅरल तेल बाजारात आणणार

95
Iran Tensions : तेल टंचाईसाठी अमेरिका १७२ बॅरल तेल बाजारात आणणार
Iran Tensions : तेल टंचाईसाठी अमेरिका १७२ बॅरल तेल बाजारात आणणार
  • ऋजुता लुकतुके

मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेलबाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा परिणाम ऊर्जा पुरवठ्यावर होत आहे. या परिस्थितीत अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने आपल्या पेट्रोलियम साठ्यातून १७२ दशलक्ष बॅरल तेल बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या तेलसाठ्याची विक्री पुढील आठवड्यापासून सुरू होणार असल्याचे विभागाने जाहीर केले.(Iran Tensions)

ऊर्जा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नियोजित दराने तेल सोडल्यास संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे १२० दिवस लागतील. या निर्णयामागील उद्देश जागतिक बाजारातील अस्थिरता कमी करणे आणि ऊर्जा सुरक्षेला स्थैर्य देणे हा आहे. विभागाने सोशल मीडियावरील निवेदनात इराणवर अमेरिकेसह सहयोगी देशांच्या ऊर्जा सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आरोपही केला.(Iran Tensions)

दरम्यान, इराणने अमेरिकेला आणि इस्त्रायलला इशारा देत दीर्घकालीन युद्ध छेडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. असे युद्ध झाल्यास जागतिक अर्थव्यवस्था गंभीरपणे कोलमडू शकते, असा इशारा तेहरानकडून देण्यात आला आहे. याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “ही मोहीम पूर्ण करूनच थांबू” असा इशारा दिला आहे.(Iran Tensions)

(हेही वाचा – US Israel Iran War: युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या ‘३ अटी’ )

मध्यपूर्वेतील संघर्ष विशेषतः होर्मूझ सामुद्रधुनी या महत्त्वाच्या सामुद्रधुनीभोवती तीव्र झाला आहे. जगातील सुमारे पाचव्या भागाइतका कच्चे तेल पुरवठा या मार्गाने होतो. इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे या सामुद्रधुनीतून होणारी जहाजवाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. परिणामी अनेक देशांना ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या लागत आहेत.(Iran Tensions)

२८ फेब्रुवारीपासून अमेरिकेने आणि इस्रायलने इराणवर हवाई हल्ले सुरू केल्यानंतर तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या हल्ल्यांमध्ये इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऊर्जी संस्थेनंही विक्रमी ४०० दशलक्ष बॅरल तेल जागतिक साठ्यातून बाजारात सोडण्याचा निर्णय घेतला आहे.(Iran Tensions)

इस्रायली लष्कराने संघर्ष अद्याप संपलेला नसल्याचे संकेत देत पुढील कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात लक्ष्य निश्चित केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणि जागतिक ऊर्जा बाजारातील अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.(Iran Tensions)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.