T20 World Cup, Ind vs SA : आतापर्यंत फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीची रोहित आणि द्रविडकडून पाठराखण

T20 World Cup, Ind vs SA : विराटला फॉर्ममध्ये येण्यासाठी एक सामना पुरेसा, असं रोहित म्हणाला आहे. 

115
T20 World Cup, Ind vs SA : आतापर्यंत फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीची रोहित आणि द्रविडकडून पाठराखण
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या विश्वचषकात कमालीचा फ्लॉप ठरला आहे. आतापर्यंत सलग ८ सामने फ्लॉप होण्याची वेळ त्याच्यावर पहिल्यांदा आली आहे. इंग्लंड विरुद्ध उपांत्य सामन्यातही तो ९ चेंडूंत ९ धावा करून बाद झाला. त्यामुळे भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली असली तरी विराटच्या फॉर्मची चर्चा ड्रेसिंग रुम आणि मीडियामध्ये होणं स्वाभाविक आहे. कर्णधार रोहितलाही मीडियाने गुरुवारी रात्री तोच प्रश्न विचारला. पण, रोहितने फुलटॉस टोलवावा तसा हा प्रश्न सीमापार धाडला. (T20 World Cup, Ind vs SA)

‘विराटसारख्या खेळाडूला फॉर्ममध्ये येण्यासाठी एक सामना पुरेसा आहे,’ असं त्याने सुरुवातीलाच सांगून टाकलं. खरंतर विश्वचषकापूर्वीच्या आयपीएलमध्ये विराट ऑरेंज कॅपधारक आहे. त्याने १५ सामन्यात ७४३ धावा केल्या होत्या. पण, अमेरिका आणि नंतर वेस्ट इंडिजमधील थोड्या संथ खेळपट्टीवर तो एकेरी धावसंख्येतच वारंवार बाद होत आहे. ८ सामन्यांत त्याच्या धावा आहेत ७५. (T20 World Cup, Ind vs SA)

‘तुम्ही १५ वर्षं क्रिकेट खेळलेले असता तेव्हा फॉर्म हा महत्त्वाचा मुद्दा नसतोच. एका सामन्यातच तो रंगात येऊ शकतो. त्याचा संघातील नुसता वावर आणि सकारात्मक दृष्टिकोन आमच्यासाठी महत्त्वाचा आहे,’ असं रोहित शर्मा पत्रकारांशी बोलताना म्हणाला. (T20 World Cup, Ind vs SA)

(हेही वाचा – Petrol, Diesel Tax : मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेल स्वस्त)

विराट ९ धावांवर बाद होऊन ड्रेसिंग रुममध्ये आला तेव्हा राहुल द्रविडनेही विराटशी बोलून त्याला शांत केलं. सामन्यानंतर मीडियाशी बोलतानाही तो विराटबद्दल आश्वस्त होता. ‘तो सध्या खूप जोखीम पत्करून खेळतोय आणि तुमचा असाच दृष्टिकोन करतो तेव्हा झटपट बाद होण्याचा धोका असतोच. पण, त्यामुळे विराटचा क्लास कमी होत नाही. मला तर वाटतं, त्याची सर्वोत्तम खेळी त्याने अंतिम फेरीसाठी राखून ठेवली असावी,’ असं द्रविड म्हणाला. (T20 World Cup, Ind vs SA)

भारतीय कर्णधार रोहित शर्मा मात्र या विश्वचषकात चांगलाच फॉर्ममध्ये आहे. कर्णधार म्हणूनही संघाला एकत्र ठेवण्यात तो यशस्वी ठरलाय. महेंद्रसिंग धोनीलाही कर्णधार म्हणून जे जमलं नाही ते त्याने शक्य करून दाखवलं आहे. एकाच वर्षात आयसीसीच्या ३ स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठण्यात कर्णधार म्हणून तो यशस्वी झालाय. कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, एकदिवसीय विश्वचषक आणि आता टी-२० विश्वचषकातही त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. (T20 World Cup, Ind vs SA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.