Maharashtra Budget 2024: महिला पूरक अर्थसंकल्प – शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशिबेन शहा

132
Maharashtra Budget 2024: महिला पूरक अर्थसंकल्प - शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशिबेन शहा
Maharashtra Budget 2024: महिला पूरक अर्थसंकल्प - शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशिबेन शहा

पावसाळी अधिवेशन (Monsoon session 2024) गुरुवार २७ जून पासून सुरु झाले. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्पात महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण, विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजना आणि मुलींचं शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ अशा अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महायुती सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प महिला पूरक असल्याचे शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशिबेन शहा (Shivsena spokesperson Adv. Sushiben Shah) यांनी म्हंटले.         (Maharashtra Budget 2024)

(हेही वाचा – Maharashtra Budget 2024 : सरकार देणार ३ गॅस सिलिंडर मोफत; कोण असतील अन्नपूर्णा योजनेची पात्र कुटुंबे ?)

महिला ही कुटुंबाचा आधार असते. अनेक महिला कुटुंबाला सांभाळत असतात. या महिलांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं आहे. यापूर्वी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस.टी बस प्रवासात महिलांना ५०% सवलत दिली. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. महायुती सरकार महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार आहे. लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना महायुती सरकरने आणल्या आहेत. महायुती सरकार हे सर्व सामान्य जनतेच आणि महिलांचं सरकार आहे. याची प्रचिती दुसऱ्या दिवशी झालेल्या अर्थ संकल्पातून येत असल्याचे ॲड. सुशिबेन शहा यांनी सांगितले.  (Maharashtra Budget 2024)

(हेही वाचा – Vikhe Patil : वाळू धोरणामध्‍ये अधिक सुलभता आणण्‍यासाठी शासन कटिबद्ध – महसूल मंत्री विखे पाटील )

आमच्या लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (CM Laadki Bahin Yojana) घोषणा केली. ही एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांना स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील. तसेच या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल. मुलींना व्यावसयायिक कोर्सेससाठी फी मध्ये सवलत  आणि २५ लाख महिलांना लखपती दिदीचा लाभ देण्याचा महायुती सरकारचा मानस असल्याचे ॲड. सुशिबेन शहा यांनी सांगितले. (Maharashtra Budget 2024)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.