T20 World Cup, Ind vs Pak : ‘तुझ्यासारखे लोक गेले कुठे?’ म्हणत सिद्धू जेव्हा आफ्रिदीला चिडवतो

T20 World Cup, Ind vs Pak : टी-२० विश्वचषकादरम्यान सिद्धू आणि आफ्रिदी समालोचनासाठी एकत्र आले होते 

121
T20 World Cup, Ind vs Pak : ‘तुझ्यासारखे लोक गेले कुठे?’ म्हणत सिद्धू जेव्हा आफ्रिदीला चिडवतो
T20 World Cup, Ind vs Pak : ‘तुझ्यासारखे लोक गेले कुठे?’ म्हणत सिद्धू जेव्हा आफ्रिदीला चिडवतो
  • ऋजुता लुकतुके

नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) आणि शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup, Ind vs Pak) स्पर्धेत समालोचनासाठी एकत्र आले आहेत. भारत, पाकिस्तान सामन्यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये दोघं एकत्र आले. दोघांमध्ये गप्पांचा फड जमला. ‘हँडसम आफ्रिदी! याच्या इतकं सुंदर आता कुणी उरलं आहे का?’ असं सिद्धूने (Navjot Singh Sidhu) नंतर फोटो काढणाऱ्या व्यक्तीलाच विचारलं. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आफ्रिदीनेही (Shahid Afridi) लागलीच सिद्धूचं कौतुक करताना, ‘यांच्याबरोबर मी खूप सारं क्रिकेट खेळलो आहे,’ अशी टिपण्णी केली.  (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- Modi 3.0: शपथविधीनंतर पंतप्रधान मोदींची पहिली सोशल पोस्ट; म्हणाले…)

त्यानंतर दोघंही पाकिस्तानी क्रिकेटच्या सध्याच्या अवस्थेवर मोकळेपणाने बोलायला लागले. ‘तुझ्यासारखे लोक संघातून कुठे गायब आजेल,’ असं सिद्धूने त्यानंतर आफ्रिदीला विचारलं. आफ्रिदी (Shahid Afridi) त्याच्या काळात घणाघाती फलंदाजी आणि अष्टपैलू फिरकीसाठी प्रसिद्ध होता. सध्याच्या पाक संघात ते अष्टपैलूत्व दिसत नाही, असं सिद्धूचं म्हणणं होतं. (T20 World Cup, Ind vs Pak)

 यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानसाठी काहीही मनासारखं झालेलं नाही. स्पर्धेपूर्वी आयर्लंड विरुद्धची टी-२० (T20 World Cup, Ind vs Pak) मालिका त्यांनी गमावली. त्यानंतर स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दुबळ्या अमरिकेकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. आता भारताविरुद्ध ६ धावांच्या पराभवानंतर पाकिस्तान संघ ए गटात तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. अमेरिकन संघाची आगेकूच सुरूच राहिली तर त्यांना साखळीतच बाद होण्याचा धोका आहे. कारण, गटवार साखळीतून फक्त २ संघ सुपर ८ मध्ये जाणार आहेत. (T20 World Cup, Ind vs Pak)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.