T20 World Cup, Ind vs Pak : ‘तेल लगाओ डाबरका, विकेट लो बाबरका,’ पंतला या घोषणेतून मिळाली प्रेरणा?

T20 World Cup, Ind vs Pak : भारत - पाक सामना असेल तर खेळाडूंची एकमेकांमधील जुगलबंदीही चर्चेचा विषय होते

131
T20 World Cup, Ind vs Pak : ‘तेल लगाओ डाबरका, विकेट लो बाबरका,’ पंतला या घोषणेतून मिळाली प्रेरणा?
T20 World Cup, Ind vs Pak : ‘तेल लगाओ डाबरका, विकेट लो बाबरका,’ पंतला या घोषणेतून मिळाली प्रेरणा?
  • ऋजुता लुकतुके

भारत – पाक सामना (T20 World Cup, Ind vs Pak) असेल तर दोन्ही बाजूचे चाहतेही भारावलेले असतात. आपला संघ जिंकावा यासाठी चाहतेही काहीही करायला तयार असतात आणि करतातही. सगळ्यात महत्त्वाचं काम चाहते करतात ते मैदानात खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं. भारत आणि पाकिस्तानमध्ये (T20 World Cup, Ind vs Pak) भाषेचीही अडचण नाही. त्यामुळे चाहत्यांमध्येही भरपूर चिडवाचिडवी आणि घोषणाबाजी होते. चाहत्यांच्या अशा कुठल्या घोषणेमुळे जिंकायचं बळ मिळालं, असा प्रश्न अलीकडेच रिषभ पंतला (Rishabh Pantla) एका कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावर पंतने चाहत्यांनी दिलेली एक घोषणाच सांगितली. ‘तेल लगाओ डाबरका, विकेट लो बाबरका!’  (T20 World Cup, Ind vs Pak)

‘खेळाडू म्हणून आम्ही आमचं १०० टक्के योगदान देत असतो. पण, त्याचवेळी असा पाठिंबा प्रेक्षकांकडून मिळाला की, मजा वाटते. ते पण, आमच्यासारखेच सामन्यात गुंतलेले असतात. भारत – पाक सामना असेल तर लोकांच्या भावनाही जोडलेल्या असतात असा अनुभव कायम येतो,’ पंतने आपली भावना बोलून दाखवली. ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात रिषभ पंत बोलत होता. यंदाच्या विश्वचषकात पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. सराव सामन्यापासून त्याला फलंदाजीची लयही सापडली आहे.  (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- Modi 3.0: शपथविधीनंतर पंतप्रधान मोदींची पहिली सोशल पोस्ट; म्हणाले…)

आयर्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात आव्हान छोटं असलं तरी रोहितच्या (Rohit) बरोबरीने तो मैदानावर तो उभा राहिला. पाकिस्तान विरुद्ध तर पंतने सर्वाधिक ४२ धावा करताना भारताला शंभरी गाठून देण्यात मोठं योगदान दिलं. त्यानंतर यष्टीरक्षण करताना त्याने ३ बळीही टिपले. दीड वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतने (Rishabh Pantla) दुखापतीचा मागमूसही त्याच्या हालचालींमध्ये दाखवून दिलेला नाही. रोहित (Rohit), विराट (Virat) सलामीला आल्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर पंतला पाठवण्याची रणनीती भारतीय संघाने आखली आहे. आघाडीच्या फळीत मिळालेल्या संधीचा पंतने चांगला फायदा उचलला आहे. (T20 World Cup, Ind vs Pak)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.