T20 World Cup, Ind vs Canada : फ्लोरिडातील पावसामुळे भारताचा सराव रद्द

T20 World Cup, Ind vs Canada : भारताच्या रविवारच्या सामन्यावरही पावसाचं सावट आहे

139
T20 World Cup, Ind vs Canada : फ्लोरिडातील पावसामुळे भारताचा सराव रद्द
T20 World Cup, Ind vs Canada : फ्लोरिडातील पावसामुळे भारताचा सराव रद्द
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने आतापर्यंत या विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup, Ind vs Canada) सलग तीन सामने जिंकले आहेत. पण, भारताची ही विजयाची मालिका यावेळी पावसामुळे खंडित होऊ शकते. भारताचा चौथा आणि शेवटचा गटवार साखळी सामना लाऊडरडेल, फ्लोरिडा इथं होणार आहे. शनिवारी कॅनडा विरुद्ध होणारा हा सामना पावसामुळे होऊ शकेल की नाही, अशी लक्षणं आहेत. शुक्रवारी अमेरिका आणि पाकिस्तान दरम्यान एक चेंडूही टाकता आला नाही. तर १४ जूनला भारतीय संघ सकाळी अकरा वाजता सराव करणार होती. तो ही रद्द करावा लागला.  (T20 World Cup, Ind vs Canada)

(हेही वाचा- Waqf Board: महाराष्ट्र सरकार मुसलमानांवर मेहेरबान, बकरी ईदच्या कुर्बानीपूर्व तपासणीत दिली भरघोस सूट !)

इथल्या हवामानाच्या अंदाजानुसार, या आठवड्यात शेवटचे तीन दिवस मुसळधार पाऊस असणार आहे. आणि या तीन दिवसांतच ए गटातील भारत, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड, पाकिस्तान हे संघ इथं खेळणार आहेत. लाऊडरहिल हे मियामी शहरापासून एक तासाच्या अंतरावर असलेलं गाव आहे. आणि इथं सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल मैदानावर (Central Broward Regional Plains) ए गटातील शेवटचे ४ सामने होणार आहेत. पण, सततच्या मुसळधार पावसामुळे इथं पूरस्थिती आहे. आणि स्थानिक यंत्रणेनं नैसर्गिक आणीबाणी जाहीर केली आहे. (T20 World Cup, Ind vs Canada)

 भारताचा अमेरिकेविरुद्धचा सामना संपल्यावर लगेचच संघ मियामीला पोहोचला. नाहीतर त्यानंतर इथली विमान सेवाही विस्कळीत झाली आहे. सततच्या पावसामुळे पाकिस्तानचं नुकसान झालं असून त्यांना गटवार साखळीतच स्पर्धेतून बाद होण्याची वेळ आली आहे. यापूर्वी श्रीलंका आणि नेपाळ दरम्यानचा सामनाही रद्द करावा लागला होता. त्यामुळे लंकन संघाचंही नुकसान झालं. खरंतर फ्लोरिडा राज्यात हा पावसाचा हंगाम नाही. पण, सध्या इथं अनियमित पाऊस आणि वादळी परिस्थिती आहे. (T20 World Cup, Ind vs Canada)

(हेही वाचा- EPFO Withdrawal: करोना काळात सुरू केलेली ‘ही’ महत्त्वाची सुविधा बंद, कारण काय ? जाणून घ्या)

आता लाऊडरहिल इथं शनिवारी भारत विरुद्ध कॅनडा (Ind vs Canada) हा सामना होणार आहे. तर रविवारी पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड (Pakistan vs Ireland) हा सामना आहे. पण, अमेरिका – आयर्लंड (America – Ireland) सामन्याप्रमाणेच पुढील दोन सामने होण्याची शक्यताही कमीच आहे. (T20 World Cup, Ind vs Canada)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.