T20 World Cup Final: विश्वचषक घेताना रोहित शर्माच्या अंगात संचारलं मेस्सीचं भुत; अनं केल असं काही… पाहा संपूर्ण Video

272
T20 World Cup Final: विश्वचषक घेताना रोहित शर्माच्या अंगात संचारलं मेस्सीचं भुत; अनं केल असं काही... पाहा संपूर्ण Video
T20 World Cup Final: विश्वचषक घेताना रोहित शर्माच्या अंगात संचारलं मेस्सीचं भुत; अनं केल असं काही... पाहा संपूर्ण Video

भारतीय संघाने दशकभराची प्रतिक्षा संपवत अखेर टी-२० विश्वचषक (T20 World Cup Final) ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने एकही सामना न गमावता टी-२० विश्वचषकाचे जेतेपद आपल्या नावे केले आहे. (T20 World Cup Final)

रोहित शर्मा मेस्सीच्या स्टाईलमध्ये

विजयानंतर प्रत्येक खेळाडूचा आनंद गगनात मावेनासा झालेला. यावेळी रोहित शर्मा वेगळ्याच मूडमध्ये दिसला. यावेळी जेतेपदाची ट्रॉफी घेण्यासाठी जाताना रोहित शर्माने केलेल्या कृतीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. जेतेपदाची ट्रॉफी घेताना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अंगात लियोनल मेस्सीचं भूत संचारलं होतं. रोहित शर्मा मेस्सीच्या स्टाईलमध्ये चालत आला आणि त्याने विश्वचषक हातात घेतला. मेस्सीची फुटबॉल कारकीर्दही अशीच काहीशी होती. वर्ल्डकपचं स्वप्न उराशी बाळगून अनेक वर्षे काढली. अखेर शेवटच्या टप्प्यात जेतेपदावर नाव कोरलं. असंच काही रोहित शर्माचं झालं आहे. टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. (T20 World Cup Final)

राहुल द्रविड यांचं भन्नाट सेलीब्रेशन

विश्वचषकाची ट्रॉफी रोहितने हाती घेतल्यानंतर सर्व खेळाडू ती ट्रॉफी घेऊन आनंद व्यक्त करत होते. याच दरम्यान जेतेपदाची ही ट्रॉफी विराट कोहलीच्या हाती आली. त्यानंतर त्याने लगेच ती राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या हातात दिली. राहुल द्रविड नेहमी शांत आणि संयमी म्हणून ओळखले जातात. यावेळी आयसीसी टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी हातात येताच राहुल द्रविड खूप आनंदी झाले. तसेच त्यांनी भन्नाट सेलीब्रेशन देखील केले. राहुल द्रविड यांचे हे रुप कधीच पाहिले नसेल. यानंतर भारतीय खेळाडूंनी राहुल द्रविडला उचलून धरले. (T20 World Cup Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.