T20 World Cup 2024 : अमेरिकेत विराट कोहली भोवती कडेकोट सुरक्षा 

T20 World Cup 2024 : भारतीय संघ आणि त्यातही विराट कोहलीसाठी स्पर्धा आयोजकांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे 

120
T20 World Cup 2024 : अमेरिकेत विराट कोहली भोवती कडेकोट सुरक्षा 
T20 World Cup 2024 : अमेरिकेत विराट कोहली भोवती कडेकोट सुरक्षा 
  • ऋजुता लुकतुके 

टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेत अमेरिका (America) हा वेस्ट इंडिजच्या (West Indies) बरोबरीने यजमान देश आहे. आणि भारताचे साखळीतील चारही सामने इथंच होणार आहेत. त्यामुळे न्यूयॉर्क मुक्कामी असलेला भारतीय संघ सध्या देशातील भारतीय आणि आशियाई जनतेसाठी प्रमुख आकर्षणाचा बिंदू ठरला आहे. त्याचवेळी स्पर्धेदरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्यामुळे भारतीय संघाभोवती सुरक्षेचं कडक जाळंही विणण्यात आलं आहे.  (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्याप्रकरणी प्रसिद्ध व्यवसायिक Kumar Gera यांच्यावर गुन्हा दाखल)

विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघातील सगळ्यात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची तर सगळ्यात जास्त काळजी घेण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओत तर विराट भोवती अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी कडं केल्याचं दिसत आहे.  (T20 World Cup 2024)

 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा महत्त्वाचा सामना येत्या ९ तारखेला न्यूयॉर्कच्या नसॉ काऊंटी क्रिकेट स्टेडिअमवर होणार आहे. आणि त्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. ‘लोकांची सुरक्षा ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. आणि हा विश्वचषक लोकांसाठी आनंददायी तसंच भयरहित जावा यासाठी मी पूर्ण तयारी केली आहे,’ असं न्यूयॉर्क राज्य पोलीस दलाचे प्रमुख कॅथी होकल यांनी म्हटलं आहे. अमेरिकन सुरक्षेचा अनुभव भारतीय कर्णधार रोहीत शर्मालाही आला. एक चाहता सरावादरम्यान मैदानात घुसला असता पोलिसांनी त्याला पकडून आपली कारवाई सुरू केली. त्यावर रोहितने पोलिसांना विनंती करून चाहत्याची सुटका केली. (T20 World Cup 2024)

 भारताने स्पर्धेतील पहिला सराव सामना बांगलादेश विरुद्ध जिंकला आहे. आता संघाचा पहिला साखळी सामना येत्या ५ जूनला आयर्लंड विरुद्ध होणार आहे.  (T20 World Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.