बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्याप्रकरणी प्रसिद्ध व्यवसायिक Kumar Gera यांच्यावर गुन्हा दाखल

173
बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्याप्रकरणी प्रसिद्ध व्यवसायिक Kumar Gera यांच्यावर गुन्हा दाखल

गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे (Gera Developments Private Limited) अध्यक्ष कुमार गेरा (Kumar Gera) यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध आवश्यक परवानग्या न घेता झाडे तोडल्याचा आरोप करण्यात आला असून, पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार १७ ते १८ मे रोजी घडल्याचे उघडकीस आले आहे. (Kumar Gera)

पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी न घेता वृक्षतोड (Gera trees felling) केल्याप्रकरणी गेरा इम्पिरियल गेट वे, गेरा डेव्हलपमेंट प्रा. लि. आणि कुमार गेरा, विजय कल्याणकर, बालाजी खांडेकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर नाशिक फाटा ते भोसरी रस्त्यावर वीज कंपनीचे कार्यालय ते सीआयआरटीच्या जॉगिंग ट्रॅकवर दोन वृक्षमित्रांमुळे हा प्रकार उघडकीस आला. संशयितांनी वृक्ष प्राधिकरण समितीची कोणतीही परवानगी न घेता वृक्षतोड केली. त्यानंतर पंचनामा करून महापालिकेने नोटीस बजावली आहे.

(हेही वाचा – Salman Khan प्रकरणात दुसऱ्या मॉड्युलमधील ५वा आरोपी गोगलीयाला हरियाणातून अटक)

असा आहे नियम

महापालिका क्षेत्रातील झाडांची वृक्षतोड करण्यासाठी महापालिका उद्यान विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवाना झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड, विनापरवाना झाड छाटल्यास १० हजार रुपये किंवा दोन वर्षांचा कारावास, अशी तरतूद आहे.

या कलमान्वये गुन्हा दाखल

महाराष्ट्र झाडे तोडणे (नियमन) अधिनियम १९६४ कलम ३/१, महाराष्ट्र झाडे तोडणे (नियमन) अधिनियम १९६४ कलम ४ आणि महाराष्ट्र (नागरिक क्षेत्र) झाडांचे सर्वेक्षण व जतन अधिनियम १९७५ कलम २१/१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

(हेही वाचा – India’s Head Coach : ‘भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल,’ – गौतम गंभीर )

तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाचे सहायक सुरेश घोडे (रा. गुलाबपुष्प उद्यान, नेहरूनगर) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव तपास करीत आहेत. मोरवाडी येथील दिवाणी न्यायालयात याबाबत खटला चालविला जाईल. (Kumar Gera)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.