Suryakumar Yadav’s Catch : सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलवरून वाद, खरंच सीमारेषा मागे घेतली होती का? 

Suryakumar Yadav’s Catch : काही ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांनी तर सीमारेषा मागे घेतली गेली होती अशा बातम्या केल्या आहेत

2671
Suryakumar Yadav’s Catch : सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलवरून वाद, खरंच सीमारेषा मागे घेतली होती का? 
Suryakumar Yadav’s Catch : सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलवरून वाद, खरंच सीमारेषा मागे घेतली होती का? 
  • ऋजुता लुकतुके 

 सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav’s Catch) टी-२० विश्वचषकाच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात सीमारेषेवर डेव्हिड मिलरचा (David Miller) अप्रतिम झेल पकडला आणि तिथेच सामना भारताने जिंकल्यात जमा झाला. भारताने या सामन्यात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ७ धावांनी विजय मिळवला.  दरम्यान, या सामन्यात सूर्यकुमार यादवने मोक्याच्या क्षणी पकडलेल्या झेलामुळे त्याचं कौतुक होत आहे. त्याचवेळी या झेलावरून वादही निर्माण झाला आहे. (Suryakumar Yadav’s Catch)

(हेही वाचा- Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश)

सूर्यकुमार यादवच्या या झेलबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. यामध्ये सूर्यकुमारने जेव्हा झेल टीपला तेव्हा त्याचा एक पाय सीमारेषेला लागला होता असं सोशल मीडियावर म्हटलं जातंय. तसेच सूर्यकुमार यादवने झेल घेतला त्या ठिकाणची सीमारेषा  मागे घेतल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात होता. (Suryakumar Yadav’s Catch)

 सूर्यकुमारने झेल घेतला, तेव्हा सीमारेषा मागे घेतल्याचं दिसून येत आहे. यावेळी सफेद रंगाची पट्टी व्हिडीओ आणि फोटोमध्ये दिसतेय. मात्र ही रेषा आधीच्या सामन्यातील होती. आधीच्या सामन्यात सफेद रंगाच्या दिसणाऱ्या रेषेवर सीमारेषा ठेवण्यात आली होती. त्यावेळी खेळपट्टी देखील वेगळी होती. मात्र अंतिम सामन्याच्या खेळपट्टीनुसार सीमारेष बदलण्यात आली होती. आणि ती आधीच्या सामन्याच्या तुलनेत मागे होती. (Suryakumar Yadav’s Catch)

सोशल मीडियावर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, त्या दिवशी वेगळंच क्षेत्ररक्षण लागलं होतं. कारण रोहित शर्मा (Rohit Sharma) कधी लॉन्ग-ऑनवर उभा राहत नाही. परंतु त्यावेळी तो तिथे होता. जेव्हा चेंडू माझ्या दिशेने येत होता तेव्हा तिकडे धावताना मी सर्वांत आधी रोहितकडे पाहिले. मला चेंडू पकडायचा तर होता, परंतु रोहित जवळ असता तर त्याच्याकडेच मी तो फेकला असता. पण तो जवळ नव्हता. यानंतर डोक्यात चक्र फिरले आणि मी मैदानाबाहेर जाऊन परत झेल टिपण्याचा मार्ग निवडला, असं सूर्यकुमार यादवने सांगितले. (Suryakumar Yadav’s Catch)

(हेही वाचा- Jio Finance Share Price : जिओची म्युच्युअल फंड व्यवसायात उतरण्याची जोरदार तयारी, शेअरवर काय होईल परिणाम?)

सूर्यकुमारचा हा झेल विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील एक यादगार झेल असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) सुर्यकुमारला या झेलावरून प्रश्न विचारले. त्यांच्याही प्रश्नामध्ये कुतुहल दिसत होतं. (Suryakumar Yadav’s Catch)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.