Jio Finance Share Price : जिओची म्युच्युअल फंड व्यवसायात उतरण्याची जोरदार तयारी, शेअरवर काय होईल परिणाम?

Jio Finance Share Price : जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरमध्ये एका वर्षांत ५५ टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे

106
Jio Finance Share Price : जिओची म्युच्युअल फंड व्यवसायात उतरण्याची जोरदार तयारी, शेअरवर काय होईल परिणाम?
Jio Finance Share Price : जिओची म्युच्युअल फंड व्यवसायात उतरण्याची जोरदार तयारी, शेअरवर काय होईल परिणाम?
  • ऋजुता लुकतुके 

गेल्यावर्षी मुकेश अंबानींच्या रिलायन्स समुहाने रिलायन्स कंपनीमधून जिओ फायनान्स (Jio Finance Share Price) ही कंपनी वेगळी केली. रिलायन्सच्या तेव्हाच्या ग्राहकांना जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे समभाग विभागून देण्यात आले. तेव्हा २४३ रुपयांच्या जवळपास मुंबई शेअर बाजारात नोंदणी झालेला हा शेअर आता ३५० रुपयांचा टप्पा ओलांडून गेला आहे. येत्या काही दिवसांत जिओ कंपनीला म्युच्युअल फंड सुरू करण्याचे वेध लागले आहेत. आणि त्यावर शेअर बाजाराची पुढील नजर असेल. (Jio Finance Share Price)

(हेही वाचा- Pune Crime: पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न!)

गेल्यावर्षी जून महिन्यात जिओ फायनान्सने ब्लॅकरॉक या कंपनीबरोबर ५० -५० असा संयुक्त उपक्रम सुरू केला असून शेअर बाजार नियामक मंडळ अर्थात सेबीकडे म्युच्युअल फंड सुरू करण्याची परवानगीही मागितली आहे. या अर्ज अजूनही सेबीच्या विचाराधीन आहे. यापूर्वी ब्लॅकरॉक यांची डीएसपी कंपनीबरोबर भागिदारी होती. आता पाच वर्षांनंतर जिओ बरोबर ते भारतीय बाजारात पुन्हा एकदा उतरणार आहेत. (Jio Finance Share Price)

या बातमीचा सकारात्मक परिणाम मागचे काही महिने जिओ फायनान्सच्या शेअरमध्येही दिसून आला आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचा शेअर २ अंशांनी वाढून ३५३ वर बंद झाला. (Jio Finance Share Price)

New Project 2024 07 06T110814.923

म्युच्युअल फंडाबरोबरच कंपनीला बँकिंग, विमा, पतपुरवठा अशा क्षेत्रातही उतरायचं आहे. आणि त्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर जिओनं भागिदारी केली आहे. कंपनीला ४,००० कोटी रुपये खर्चून बँकिंग व्यवसाय सुरू करायचा आहे. आणि त्यासाठी केअर या रेटिंग एजन्सीने कंपनीला AAA असं रेटिंग दिलं आहे.  (Jio Finance Share Price)

(हेही वाचा- State Govt: शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी विशेष जनसुरक्षा कायदा, राज्य सरकारचा निर्णय)

रिलायन्सची आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील पहिल्या तिमाहीतील कामगिरीही चांगली असेल असा अंदाज आहे. त्यामुळे युएसबी या जागतिक रिसर्च कंपनीने जिओ फायनान्समध्ये पुढील वर्षात १० टक्रे वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. जेफरीज या आणखी एका ब्रोकरेज कंपनीने जिओच्या व्यावसायिक रणनीतीवर विश्वास व्यक्त केला आहे. पतपुरवठा क्षेत्रात कंपनीचं धोरण आवश्यक तितक्या सावधानतेचं आहे. आणि त्याचा फायदा कंपनीला मिळेल, असं जेफरीजनी म्हटलं आहे. त्यामुळे दीर्घ मुदतीसाठी जिओ फायनान्शिअर सर्व्हिसेसवर ब्रोकरेज कंपन्यांनी सकारात्मक कौल दिला आहे. (Jio Finance Share Price)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.