Pune Crime: पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न!

246
Pune Crime: पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न!
Pune Crime: पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न!

पुण्यात महिला वाहतूक पोलीस (Traffic Police) अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल (Petrol) ओतून जाळण्याचा प्रयत्न (Pune Crime) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

आरोपी संजय फकिरा साळवे असे आरोपीचे नाव आहे. राहणार- पिंपरी चिंचवड(मूळगाव- जालना) याला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. आरोपीने दारू पिऊन कृत्य केलं असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली. गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. पोलिस अधिक तपास करत आहेत. (Pune Crime)

ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई

पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल (शुक्रवारी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असताना महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती मिळत आहे. (Pune Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.