Suryakumar Yadav : सुर्यकुमार यादवने कॅमेरून ग्रीनला लगावलेले ४ षटकार पाहिलेत का?

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी बहरली

67
Suryakumar Yadav : सुर्यकुमार यादवने कॅमेरून ग्रीनला लगावलेले ४ षटकार पाहिलेत का?

ऋजुता लुकतुके

रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात (Suryakumar Yadav) भारतीय संघाने ९९ धावांनी विजय मिळवला. एकूणच भारतीय फलंदाजी या सामन्यात बहरली आणि संघाने ५ बाद ३९९ धावांचा डोंगर उभारला. पण, त्यातही संघाला ४०० च्या जवळ नेण्यात प्रमुख भूमिका बजावली ती टी-२० स्पेशल फलंदाज (Suryakumar Yadav) सुर्यकुमार यादव.

कॅमेरुन ग्रीनच्या एकाच षटकात त्याने सलग चार षटकारही लागवले. ग्रीन हा सुर्यकुमारचा (Suryakumar Yadav) मुंबई इंडियन्स संघातील साथीदार. पण, भारतीय डावातील ४३व्या षटकांत सुर्यकुमारने ग्रीनची भलतीच धुलाई केली. या षटकातील पहिलाच चेंडू त्याने डीप बॅकवर्ड स्केअर लेगला टोलवला. त्याच्या पुढच्या चेंडूवर फाईन लेगला त्याने षटकार वसूल केला.

त्यानंतर ग्रीनने आपल्या चेंडूची दिशा बदलली. पण, हा चेंडू त्याने उजव्या यष्टीच्या जास्तच बाहेर टाकला, आणि सुर्यकुमारने (Suryakumar Yadav) तो लागलीच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जोरदार भिरकावला. चौथा चेंडू टाकताना ग्रीन भांबावलेला होता. हा फुलर चेंडूही सुर्यकुमारने डीप मिड-विकेटवर उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बाहेर फेकला. सुर्यकुमारचे हे चारही फटके तुम्ही इथं पाहू शकता,

रविवारी सकाळी केलेल्या या ट्विटमधील व्हीडिओ आतापर्यंत (Suryakumar Yadav) दहा लाखांच्या वर लोकांनी पाहिला आहे, आणि साडे तीनशेच्या वर लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

(हेही वाचा – R Ashwin : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत अश्विनने मोडला अनिल कुंबळेचा ‘हा’ विक्रम)

सुर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) झंझावाती खेळीमुळेच भारतीय संघ या सामन्यात ४००च्या जवळ पोहोचू शकला. त्याने ३७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरनेही शतकी खेळी केली. शुभमनचं या वर्षातील हे पाचवं शतक आहे.

कर्णधार के एल राहुलने ५२ धावा केल्या. त्यामुळे भारताने ऑस्ट्रिलियासमोर विजयासाठी ४०० धावांचं आव्हान ठेवलं. पण, ऑस्ट्रेलियन डाव सुरू असताना दोनदा पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे संघाला ३३ षटकांत ३१७ धावांचं सुधारित लक्ष्य ठेवण्यात आलं.

पण, अश्विनच्या अचूक फिरकी गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघ २९व्या षटकांत २१७ धावांतच बाद झाला. आणि भारतीय संघाने (Suryakumar Yadav) दुसरा एकदिवसीय सामना ९९ धावांनी जिंकला. त्याबरोबरच तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना बुधवारी राजकोट इथं होणार आहे.

ही मालिका भारतीय संघाची (Suryakumar Yadav) एकदिवसीय विश्वचषकापूर्वीची शेवटची मालिका आहे. पाच महत्त्वाचे खेळाडू विश्रांती घेत असताना भारतीय संघाने हा विजय साकारल्यामुळे भारतीय संघ प्रशासन नक्कीच खुश असेल. तिसऱ्या सामन्यात मात्र रोहीत शर्मा आणि विराट कोहली बरोबरच इतरही महत्त्वाचे खेळाडू संघात परततील अशी शक्यता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.