सौरव गांगुलीला BCCI च्या अध्यक्षपदावरून हटवण्याबाबत नवा ट्विस्ट, न्यायालयात याचिका दाखल

111

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जागी अलीकडेच भारताच्या 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) नवीन अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मात्र आता सौरव गांगुली यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावरून हटवण्याविरोधात कलकत्ता उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे. वकील रामप्रसाद सरकार यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – ‘या’ व्यक्तीने Twitter ला दिली कमाईची आयडीया; ज्यामुळे झाली एवढी मोठी उलथापालथ!)

गांगुली यांना बीसीसीआयच्या प्रमुखपदावरून हटवण्यात आले होते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही ते आणखी तीन वर्षे त्या अध्यक्षपदावर राहू शकतात, असा सरकारचा युक्तिवाद आहे. यावेळी ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जय शाह यांना 2025 पर्यंत आणखी तीन वर्षे बीसीसीआय सचिवपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला. महत्वाचं म्हणजे, जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी कायम असूनही गांगुली यांना हटवण्यात आलं. पुढे ते असेही म्हणाले की, हा राज्याचा अपमान आहे. त्यांना हटवण्यामागे नक्कीच काहीतरी राजकीय षडयंत्र आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर गांगुलीने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष होण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेतली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये प्रचंड राजकीय खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री ममता यांच्याशिवाय अनेक नेत्यांनी त्यांच्या बाजूने विधाने केली होती आणि त्यांची हकालपट्टी हा राजकीय षडयंत्र आणि त्यांच्यावरील अन्याय असल्याचे म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.