Smriti Mandhana : स्मृती मंधानाच्या ७,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण

Smriti Mandhana : दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध स्मृतीने १२७ चेंडूंत ११७ धावा केल्या. 

77
Smriti Mandhana : स्मृती मंधानाच्या ७,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण
  • ऋजुता लुकतुके

दक्षिण आफ्रिकन महिला संघा विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) ७,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा टप्पा गाठणारी ती फक्त दुसरी भारतीय महिला आहे. यापूर्वी मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,८६८ धावा केल्या आहेत. तर सध्याच्या भारतीय संघातील स्मृतीची साथीदार आणि भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरही ६,८७० धावा करत स्मृतीच्या मागोमाग आहे. (Smriti Mandhana)

स्मृतीची बंगळुरूमधील खेळी विशेष महत्त्वाची ठरली. थोड्या पावसामुळे काहीशी ओलसर झालेली चिन्नास्वामी मैदानावरील खेळपट्टी सुरुवातीपासून खेळायला थोडी अवघड होती. त्यामुळे सुरुवातीपासून आपले नैसर्गिक फटके खेळणारे फलंदाज जाळ्यातही अडकले. पण, स्मृती (Smriti Mandhana) ठामपणे पाय रोवून उभी राहिली. दुसऱ्या बाजूने गडी बाद होत असताना तिने आपली भूमिका जबाबदारीने पार पाडली. १२७ चेंडूंत ११७ धावा करताना तिने १ षटकार आणि १२ चौकार ठोकले. (Smriti Mandhana)

(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha: शिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख ठरली; ‘इथे’ मिळणार वाघनखांचं दर्शन)

स्मृतीचं (Smriti Mandhana) हे एकूण सहावं एकदिवसीय शतक आणि भारतीय मैदानावर केलेलं पहिलंच. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या भारतीय महिलांच्या यादीतही आता ती दुसऱ्या स्थानावर आहे. तिच्या पुढे इथंही फक्त मिताली राज आहे. तर दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध भारतीय महिला संघाकडून शतक झळकावणारी स्मृती पहिलीच फलंदाज आहे. (Smriti Mandhana)

स्मृतीबरोबर (Smriti Mandhana) दीप्ती शर्माने महत्त्वपूर्ण ८१ धावांची भागिदारी केली. ५ बाद ९९ नंतर दोघींनी भारताचा डाव सावरला आणि तो दोनशे पारही नेला. त्या पाठोपाठ पूजा वस्त्राकार आणि स्मृतीने तो अडिचशेच्या वर नेला. या दरम्यान दीप्ती शर्माने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत २,००० धावांचा टप्पा पार केला. (Smriti Mandhana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.