Ronaldinho : ब्राझीलचा फुटबॉल स्टार रोनाल्डिनो चक्क दुर्गापूजेसाठी बंगालमध्ये दाखल

ब्राझीलचा माजी स्टार खेळाडू रोनाल्डिनो सध्या भारत दौऱ्यावर आहे.

140
Ronaldinho : ब्राझीलचा फुटबॉल स्टार रोनाल्डिनो चक्क दुर्गापूजेसाठी बंगालमध्ये दाखल

ऋजुता लुकतुके

ब्राझीलचा माजी स्टार फुटबॉलपटू आणि या खेळातील आयकॉन समजला जाणारा रोनाल्डिनो (Ronaldinho) आपल्या दोन दिवसांच्या कोलकाता भेटीसाठी भारतात आला आहे. या दरम्यान तो एका दुर्गापूजा मंडपाचं उद्घाटनही करणार आहे. कोलकात्यातले फुटबॉल प्रेमी रविवारी संध्याकाळी रोनाल्डिनोच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठ्या संख्येनं हजर होते.

भारतात कोलकाता शहराचं फुटबॉल प्रेम (Ronaldinho) वादातीत आहे. मोहन बागान, ईस्ट बंगाल असे नावाजलेले क्लब इथं आहेत. आणि यापूर्वीही जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू इथं येऊन गेले आहेत. मॅराडोना, पेले आणि लियोनेल मेस्सी यांनीही ते खेळत असताना कोलकाता शहराला भेट दिलेली आहे.

रोनाल्डिनोची (Ronaldinho) मात्र ही पहिलीच भारत भेट आहे. तो अगदी दुर्गापूजेच्या काळात इथं आला आहे. दौऱ्यात तो मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.

(हेही वाचा – Afghanistan Upsets England : अफगाणिस्तानच्या इंग्लंडवरील विजयानंतर माजी खेळाडूंकडून संघावर कौतुकाचा वर्षाव )

या महिन्याच्या सुरुवातीलाच २००५मध्ये फिफाचा वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू (Ronaldinho) ठरलेला रोनाल्डिनोने आपल्या भारत भेटीची माहिती फेसबुकवर दिली होती. त्या पोस्टमध्ये त्याने भारत भेटीचा कार्यक्रमही सांगितला होता. ‘मी ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर कोलकाता भेटीसाठी भारतात येणार आहे. तिथे आर१० या माझ्या क्लबमधील लहान मुलांबरोबर मी फुटबॉल खेळणार आहे. आणि त्यांना काही डावपेचही शिकवणार आहे. शिवाय काही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही माझा सहभाग असेल. मी श्री भूमी स्पोर्टिंगच्या दुर्गापूजा कार्यक्रमातही हजर राहणार आहे,’ असं या पोस्टमध्ये रोनाल्डिनोनं लिहिलं होतं.

https://www.facebook.com/ronaldinho/posts/907959690697993?ref=embed_post

कोलकाता शहराला फुटबॉल प्रेमाची मोठी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या शहरात विविध लोकांशी संवाद साधून फुटबॉलचा प्रसार करण्याचा (Ronaldinho) रोनाल्डिनोचा हेतू आहे. कोलकाता शहराचा ब्राझीलच्या राष्ट्रीय संघालाही पाठिंबा राहिलेला आहे. यावेळी भारतातील लोकप्रिय खेळ क्रिकेट शिकण्याची इच्छाही रोनाल्डिनोने बोलून दाखवली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.