Afghanistan Upsets England : अफगाणिस्तानच्या इंग्लंडवरील विजयानंतर माजी खेळाडूंकडून संघावर कौतुकाचा वर्षाव 

या विश्वचषकातील पहिला धक्कादायक पराभव नोंदवताना अफगाणिस्तान संघाने बलाढ्या इंग्लंडचा ६९ धावांनी मजबूत पराभव केला. त्यानंतर आत्मविश्वासपूर्ण खेळ करणाऱ्या अफगाण संघाचं कौतुक होतंय

102
Afghanistan Upsets England : अफगाणिस्तानच्या इंग्लंडवरील विजयानंतर माजी खेळाडूंकडून संघावर कौतुकाचा वर्षाव 
Afghanistan Upsets England : अफगाणिस्तानच्या इंग्लंडवरील विजयानंतर माजी खेळाडूंकडून संघावर कौतुकाचा वर्षाव 

ऋजुता लुकतुके

अफगाणिस्तान संघाने रविवारी बलाढ्य इंग्लिश संघाला धडा शिकवला. पहिली फलंदाजी करताना आधी त्यांनी २८४ धावांचं तगडं आव्हान उभं केलं. आणि अनुभवी इंग्लिश संघाला ४० षटकांत २१५ धावांवर बाद केले. रहमनुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झरबान यांनी ११४ धावांची सलामी संघाला करून दिली. त्याही गुरबाझच्या ५७ चेंडूत केलेल्या ८० धावांच्या खेळीमुळे अफगाण डावाचा पाया रचला गेला.

भारताविरुद्धही अफगाणिस्तानने २७५ धावांचा पल्ला गाठला होता. त्यामुळे त्यांची फलंदाजी चांगली होतेय. त्याला अनुभवी फिरकी गोलंदाज रशिद खानची साथ मिळाली. आणि त्यांनी इंग्लंडला धूळ चारण्याचा पराक्रम केला. आतापर्यंच्या विश्वचषकाच्या इतिहासातील हा सगळ्यात धक्कादायक विजय मानला जातोय. कारण, अफगाणिस्तानने गतविजेत्यांनाच हरवलं.

(हेही वाचा-Ind vs Ban : पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी पुण्यात पोहोचला तो क्षण )

गंमत म्हणजे काही माजी खेळाडूंना अफगाणिस्तानचा हा विजय तितका आश्चर्यकारक वाटत नाहीए. त्यांना संघाच्या गुणवत्तेची पूर्वकल्पना होती, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इंग्लंड विरुद्धच्या विजयानंतर या खेळाडूंनी अफगाण संधाची मुक्त कंठाने स्तुतीही केली आहे. अशाच ट्विटरवर आलेल्या काही प्रतिक्रिया पाहूया,

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.