Rohit Sharma : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात दाखल, पर्थमध्ये केला नेट्समध्ये सराव

Rohit Sharma : पर्थ कसोटीच्या चौथ्या दिवशी रोहित शर्मा ड्रेसिंग रुममध्ये दिसला.

115
IPL 2025, MI vs CSK : रोहित शर्माचा आयपीएलमध्ये अनोखा विक्रम
  • ऋजुता लुकतुके

पितृत्वाच्या रजेमुळे पर्थ कसोटीला मुकलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. कसोटीच्या चौथ्या दिवशी तो ड्रेसिंग रुममध्ये गौतम गंभीरच्या शेजारी बसलेलाही दिसला. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने भारतीय संघाचं नेतृत्व केलं. तर यशस्वी जयस्वाल सोबत सलामीला के. एल. राहुल आला. पर्थ कसोटीच्या २ दिवस आधी रोहितची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे आणि या प्रसंगी कुटुंबाबरोबर राहण्यासाठी रोहित संघाबरोबर ऑस्ट्रेलियात आला नव्हता.

रोहितने पर्थ कसोटीच्या चौथ्या दिवशी नेट्समध्ये फलंदाजीही केली. मंगळवारी कसोटीत खानपानाची सुटी असताना यश दयाल, मुकेश कुमार यांच्या गोलंदाजीवर मुख्य मैदानावर रोहितने सराव केला. फॉक्स न्यूजने याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्विट केला आहे.

(हेही वाचा – BJP : भाजपा हायकमांडशी चर्चा करण्यासाठी शिंदे, फडणवीस, पवार दिल्लीत येणार)

पर्थ कसोटी चौथ्या दिवशीच संपल्यामुळे भारतीय संघाला एक दिवस विश्रांती मिळेल. त्यानंतर बुधवारी लगेचच भारतीय संघ कॅनबेराला रवाना होईल. तिथे अध्यक्षीय संघाबरोबर एक दोन दिवसांचा सराव सामना होणार आहे. या सामन्याला प्रथमश्रेणी सामन्याचा दर्जा नसला तरी संघाला सरावाच्या दृष्टीने या सामन्याचं महत्त्व मोठं आहे. रोहित शर्मासाठी तर हा ऑस्ट्रेलियातील पहिला सरावाचा सामना असेल. कॅनबेरातून येत्या शनिवारी भारतीय संघ दुसऱ्या कसोटीसाठी ॲडलेडला पोहोचेल.

दरम्यान, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने पर्थ कसोटी २९५ धावांनी जिंकली आहे. बदली कर्णधार जसप्रीत बुमराहचे सामन्यांत ८ बळी आणि यशस्वीच्या १६१ तर विराटच्या नाबाद १०० धावांच्या जोरावर मोठ्या फरकाने ही कसोटी जिंकून भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.