Shiv Sena UBT च्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड

आदित्य ठाकरेंवर संयुक्त सभागृहाच्या नेतेपदाची जबाबदारी

151
Shiv Sena UBT च्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड
  • प्रतिनिधी

राज्यात सत्तेत आलेल्या महायुती सरकारवर काबू ठेवण्यासाठी शिवसेनेचा (ठाकरे) आक्रमक व अभ्यासू चेहरा समजल्या जाणाऱ्या भास्कर जाधव यांची शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटनेतेपदी वर्णी लावली आहे. विधानसभा आणि विधान परिषद या संयुक्त सभागृहाच्या नेतेपदी आदित्य ठाकरे तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी शिवसेनेच्या (उबाठा) आमदारांची मातोश्री निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दरम्यान, ठाकरे यांनी सावध भूमिका घेत, नवनिर्वाचित आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतले आहेत. खासदार तथा सचिव अनिल देसाई, नेते सुभाष देसाई, संजय राऊत यांच्यासह वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

(हेही वाचा – BJP : भाजपा हायकमांडशी चर्चा करण्यासाठी शिंदे, फडणवीस, पवार दिल्लीत येणार)

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी थेट लढत झाली. महायुती पुढे आघाडी निष्प्रभ ठरली. राज्यात महायुतीची एकहाती सत्ता आणली. सध्या मुख्यमंत्री पदावरून महायुतीत काथ्याकूट सुरू असताना, महायुतीच्या नेत्यांकडून शिवसेना (उबाठा) (Shiv Sena UBT) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जातो आहे. दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्ष फुटाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खबरदारी घेत, निवडून आलेल्या २० आमदारांची मातोश्री निवासस्थानी सकाळी ११ वाजता बैठक घेतली. विधानसभेत पक्षाची बाजू आमक्रमपणे मांडण्यासाठी विधिमंडळाच्या कायद्याचा अभ्यास असलेल्या भास्कर जाधव यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व आमदारांनी एकमताने जाधव यांच्या निवडीला समर्थन दिले. पक्षप्रमुख यांचा निर्णय सर्व आमदारांना बंधनकारक राहिली, या संदर्भातील हमी पत्र यावेळी लिहून घेण्यात आले. दरम्यान, विधानसभेतील यशावर चर्चा करताना, निकालावर संशय व्यक्त करण्यात आला.

(हेही वाचा – विधानसभा निवडणुकीत Maha Vikas Aghadi चे २८ उमेदवार तिसऱ्या स्थानावर, वाचा उमेदवारांची नावे)

आदित्य ठाकरेंकडे संयुक्त सभागृहाचे नेते पद

विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांच्या नेते पदाची जबाबदारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर प्रतोद पदी सुनील प्रभू यांची निवड केली आहे. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.