Rohit Sharma ने केली धोनीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत रोहीत शर्माची बॅट तळपली नसली तरी कप्तानीत त्याने एक शिखर सर केलं आहे. टी-२० क्रिकेटमध्ये रोहीतच्या नावावर आणखीही काही विक्रम आहेत. सर्वाधिक १८२ षटकार त्याच्या नावावर आहेत. तसंच टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो विराट कोहली पाठोपाठ दुसरा आहे.

164
Rohit Sharma ने केली धोनीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

ऋजुता लुकतुके

अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार रोहीत शर्मा (Rohit Sharma) नेमका शून्यावर त्रिफळाचीत झाला. संघाच्या विजयात फलंदाज म्हणून तो योगदान देऊ शकला नाही. पण, कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीच्या एका विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. रोहीत आता धोणीच्या बरोबरीने टी-२० प्रकारातील भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार ठरला आहे.

(हेही वाचा –  Central Railway : नागपूरमार्गे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द, वेळापत्रक पहा)

महेंद्र सिंग धोणीने ७१ टी-२० सामन्यांत भारताचं नेतृत्व केलं आणि यातील ४१ सामने त्याने जिंकूनही दिले होते. आता रोहीतने (Rohit Sharma) ४१ विजय मिळवत या विक्रमाशी बरोबरी केली आहे. शिवाय रोहीतला इथपर्यंत पोहोचायला फक्त ५३ सामने लागले.

रोहीत शर्मासाठी (Rohit Sharma) एकूणच अफगाणिस्तान विरुद्धची ही मालिका त्याच्या कारकीर्दीतील एक मैलाचा दगड ठरली आहे. एकतर १४ महिन्यांनंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. त्यातच रविवारी इंदूर इथं झालेला सामना रोहीतसाठी १५० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना होता. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू आहे. (Rohit Sharma)

(हेही वाचा – IndiGo Passenger यांच्यावर जमिनीवर बसून जेवण्याची वेळ; व्हिडीओ वायरल)

टी-२० क्रिकेटमध्ये रोहीतच्या (Rohit Sharma) नावावर आणखीही काही विक्रम आहेत. सर्वाधिक १८२ षटकार त्याच्या नावावर आहेत. तसंच टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो विराट कोहली पाठोपाठ दुसरा आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.