Ravichandran Ashwin : अश्विनची घरगुती कारणामुळे तिसऱ्या कसोटीतून माघार

तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी अश्विनने ५०० कसोटी बळी पूर्ण केले होते.

241
IPL 2024 : राजस्थान संघाने रवीचंद्रन अश्विनचं केलं ‘असं’ भावपूर्ण स्वागत 
IPL 2024 : राजस्थान संघाने रवीचंद्रन अश्विनचं केलं ‘असं’ भावपूर्ण स्वागत 
  • ऋजुता लुकतुके

भारताचा ज्येष्ठ फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) सध्या सुरू असलेल्या राजकोट कसोटीतून दुसऱ्याच दिवशी माघार घेतली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी रात्री एक पत्रक काढून ही बातमी दिली. अश्विनच्या घरातील एक व्यक्ती आजारी असल्यामुळे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याने ही कसोटी सोडली आहे.

‘अश्विनने तातडीने या कसोटीतून माघार घेतली आहे. त्याच्या घरी उद्भवलेल्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे तो घरी परतत आहे. आणि त्याच्या घरी उद्भवलेल्या कठीण प्रसंगी बीसीसीआय त्याच्या पाठीशी उभं आहे,’ असं बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. अश्विनच्या वैयक्तिक आयुष्यातील खाजगीपणा जपला जावा अशी अपेक्षाही बीसीसीआयने व्यक्त केली आहे.

बीसीसीआय प्रशासन आणि संघातील खेळाडू अश्विनशी संपर्कात राहून त्याला आवश्यक ती मदत करण्यासाठी सज्ज आहेत, असंही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. राजकोट कसोटीचे अजून ३ दिवस बाकी आहेत. शुक्रवारी सकाळी अश्विनने इंग्लिश सलामीवीर झॅक क्रॉलीला बाद करत आपला ५०० वा बळी टिपला होता. पण, उर्वरित तीन दिवस तो खेळू शकणार नसल्याने भारतीय संघाला हा खूप मोठा धक्का आहे.

(हेही वाचा – Chiplun : राणे-जाधव संघर्ष; दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता)

भारतीय संघाने पहिल्या डावात ४३५ धावा केल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद २०७ अशी मजल मारली आहे. त्यामुळे कसोटीचं पारडं सध्या समसमान आहे. अशावेळी ती जिंकायची झाल्यास भारताची भिस्त अनुभवी आर अश्विनवर होती.

दरम्यान, अश्विनच्या आईची तब्येत अचानक बिघडल्याचं कळतंय. बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी तसं ट्विट केलं आहे.

अश्विनची आई चित्रा यांची तब्येत बिघडली आहे. आणि तिच्याबरोबर राहण्यासाठी अश्विन चेन्नईला रवाना झाला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.