Chiplun : राणे-जाधव संघर्ष; दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता

पोलिसांनी दोन्ही कडील ३५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

210

चिपळूण (Chiplun) येथे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण पेटले आहे. या ठिकाणी चिपळूणचे आमदार उबाठाचे नेते भास्कर जाधव आणि भाजपचे नेते निलेश राणे यांच्यातील संघर्ष पेटला आहे. या ठिकाणी दोन्ही नेत्यांकडून मारामारीच्या धमक्या याआधी देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शनिवार, १६ फेब्रुवारी रोजी याठिकाणी ठिणगी पडलीच. या ठिकाणी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने एकमेकांना भिडले. त्यामुळे इथे तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी दोन्ही कडील ३५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

(हेही वाचा Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील म्हणतात, कुणबी आणि मागासवर्गीय आयोग दोन्हींचे आरक्षण मिळाले तर आनंदच)

काय घडले होते? 

भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या ताफ्यातील गाड्यांवर भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुहागरमध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात शुक्रवारी बाचाबाची झाली. यावेळी राणे आणि ठाकरे समर्थकांनी दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. भाजपचे आमदार, भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांची गुहागर (Chiplun) येथे जाहीर सभा होती. भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात तळी येथे होत असलेल्या सभेला विरोध केला जात होता. निलेश राणे यांच्या सभेपूर्वी हा राडा झाला. यामुळे कोकणातील वातावरण तापले. या ठिकाणी झालेल्या दगडफेकीत ४० कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.