Rahul Dravid : राहुल द्रविड यांचा नवीन कार्यकाळ दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतरच ठरणार

राहुल द्रविड आणि त्यांचे प्रशिक्षक सहकारी यांचा नवीन करार दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून परतल्यावरच ठरणार असल्याचं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

171
Rahul Dravid : आयपीएल सुरू होण्यापूर्वी राहुल द्रविडचा खेळाडूंच्या नावे संदेश
  • ऋजुता लुकतुके

राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि त्यांचे प्रशिक्षक सहकारी यांचा नवीन करार दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून परतल्यावरच ठरणार असल्याचं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केलं आहे. (Rahul Dravid)

भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि त्यांचा सहकारी वर्ग यांना मुदतवाढ मिळाली असली तरी बीसीसीआयबरोबरचा नवीन करार त्यांनी अजून केलेला नाही. संघ सध्याच्या आफ्रिका दौऱ्यावरून परतल्यावरच करारातील छोट्या-मोठ्या गोष्टी निश्चित करण्यात येतील आणि तेव्हाच नवीन करार नेमका कधीपर्यंत असेल हे ठरवलं जाईल. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली आहे. (Rahul Dravid)

(हेही वाचा – Ind vs SA T20 Series : मार्करम आणि सुर्यकुमार यांनी जेव्हा फ्रीडम मालिकेच्या चषकाचं अनावरण केलं )

‘विश्वचषक संपल्यानंतर आमच्याकडे बोलायला वेळच नव्हता. पण, मी द्रविड (Rahul Dravid) यांच्याबरोबर एक बैठक घेतली. आमचं एकमत आहे हे कळल्यावर दक्षिण आफ्रिका दौरा आधी पार पडू दे. मग तिथून परत आल्यावर कराराची प्रक्रिया पूर्ण करू, असं आमच्यात ठरलं.’ असं जय शाह पीटीआयशी बोलताना म्हणाले. (Rahul Dravid)

राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषकात उपविजेतेपदापर्यंत मजल मारली. तर यापूर्वी सलग दोनदा भारतीय संघ कसोटी विजेतेपदाच्या अंतिम फेरीतही पोहोचला आहे. त्यामुळे द्रविड (Rahul Dravid) यांनी किमान आगामी टी-२० विश्वचषकापर्यंत भारतीय संघाबरोबर रहावं अशी बीसीसीआयची इच्छा होती. (Rahul Dravid)

मध्यंतरी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत राहुल यांनी विश्रांती घेतली होती आणि त्यांच्या जागी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं. आता द्रविड (Rahul Dravid) पुन्हा एकदा भारतीय संघाबरोबर आहेत. पण, ते आणखी किती काळ संघाचे प्रशिक्षक म्हणून काम बघणार ती मुदत आफ्रिका दौऱ्यानंतर ठरणार आहे. (Rahul Dravid)

(हेही वाचा – Share Market: सेन्सेक्सने उच्चांक गाठला, कोणते शेअर्स वधारले; वाचा सविस्तर…)

जय शाह (Jai Shah) यांनी पीटीआयबरोबरच्या मुलाखतीत इतरही काही मुद्दयांवर भाष्य केलं आहे. विश्वचषका दरम्यान दुखापतग्रस्त झालेला हार्दिक पांड्या अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी तंदुरुस्त होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या हार्दिक बंगळुरूमध्ये राष्ट्रीय अकादमीत सराव करत आहे. (Rahul Dravid)

‘बीसीसीआयच्या डॉक्टरांचं हार्दिकच्या तंदुरुस्तीकडे लक्ष आहे. तो ही मेहनत घेतोय. आता तो सामना खेळण्या इतका तंदुरुस्त झाला मीडियाला नक्की खबर केली जाईल,’ असं जय शाह (Jai Shah) म्हणाले. तर डब्ल्यूपीएल स्पर्धा फेब्रुवारीत एकाच राज्यात घेण्याचा बीसीसीआयचा विचार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आयपीएलचा कार्यक्रम सार्वत्रिक निवडणुकांचा अंदाज घेऊन निश्चित करण्यात येईल, असंही ते म्हणाले. (Rahul Dravid)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.