Rahul Dravid Extension : राहुल द्रविड यांना मुदतवाढीसाठी राजी करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न 

91
Rahul Dravid Extension : राहुल द्रविड यांना मुदतवाढीसाठी राजी करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न 
Rahul Dravid Extension : राहुल द्रविड यांना मुदतवाढीसाठी राजी करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न 

ऋजुता लुकतुके

विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले राहुल द्रविड (Rahul Dravid Extension) यांना आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यासाठी बीसीसीआय उत्सुक आहे. निदान आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तरी राहुल यांनी संघाबरोबर जावं यासाठी त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं समजतंय. द्रविड मुख्य प्रशिक्षक असताना भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशिप आणि आता एकदिवसीय विश्वचषकातही उपविजेता ठरला. आता खेळाडू आणि त्यांच्यामध्ये तयार झालेलं नातं असंच राहावं असा बीसीसीआयचा विचार आहे.

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा ८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या दौऱ्यात संघ ३ टी-२०. ३ एकदिवसीय सामने आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. सध्या या दौऱ्यात तरी द्रविड संघाबरोबर असावेत असा बीसीसीसीआयचा प्रयत्न सुरू आहेत. आणि कमी अवधीच्या या तात्पुरत्या कराराची तयारी बीसीसीआयने सुरू केली आहे.

‘बीसीसीआयचे सचिव जय शाह गेल्याच आठवड्यात राहुल द्रविड यांना बंगरुळू इथं जाऊन भेटले आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीचा करार तरी प्रत्यक्षात यावा यासाठी दोघांनी बोलणी केली आहेत,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला सांगितलं आहे. तशी बातमी पीटीआय वृत्तसंस्थेनं दिली आहे.

(हेही वाचा-Narendra Modi: ४१ मजुरांशी पंतप्रधानांनी साधला संवाद, प्रकृतीची विचारपूस करून धाडसाचे केले कौतुक)

‘कराराची पूर्तता सध्या सुरू आहे. आणि द्रविड टी-२० मालिकेसाठी आफ्रिकेत जाऊ शकले नाहीत, तरी एकदिवसीय मालिका आणि कसोटी मालिकेसाठी ते नक्की आफ्रिकेत पोहोचलीत,’ असा विश्वास या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

व्ही व्ही एस लक्ष्मण सध्या इतर गोष्टींमध्ये गुंतले आहेत. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत नवीन सुविधा सुरू करण्याचं काम सुरू आहे, शिवाय आधी ठरल्याप्रमाणे ते भारती ए संघाबरोबर काम करतायत आणि आगामी १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकावर त्यांची नजर असेल. त्यामुळे लक्ष्मण सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असले तरी वरिष्ठ संघाला ते पूर्ण वेळ देऊ शकणार नाहीत.

त्यामुळे द्रविड (Rahul Dravid Extension) यांच्यासारखा आफ्रिका दौऱ्याचा अनुभव असलेला प्रशिक्षकच संघाबरोबर असावा असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.