Rafael Nadal : पुनरागमनाच्या स्पर्धेत नदालची उपउपांत्य फेरीत मजल

युनायटेड चषक सांघिक स्पर्धेत नदालने जेसन कबलरचा सहज पराभव करत आगेकूच केली आहे.

219
Rafael Nadal : बार्सिलोना ओपनमध्ये राफेल नदालचं आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात
  • ऋजुता लुकतुके

युनायटेड चषक सांघिक स्पर्धेत नदालने जेसन कबलरचा सहज पराभव करत आगेकूच केली आहे. (Rafael Nadal)

ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने उपउपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या वाईल्डकार्ड खेळाडू जेसन कबलरवर त्याने ६-१, ६-२ अशी आरामात मात केली. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या वेळी गेल्यावर्षी नदाल आपला शेवटचा व्यावसायिक सामना खेळला होता. त्यानंतर ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत नदाल आतापर्यंत दोन सामने जिंकला आहे. (Rafael Nadal)

कबलर विरुद्ध ३७ वर्षीय नदालने पहिल्याच सेटमध्ये वर्चस्व मिळवलं. पहिले पाच गेम सलग जिंकत नदालने ५-० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर कबलरला फक्त एक गेम जिंकता आला. आणि हा सेट नदालने ६-१ असा खिशात टाकला. (Rafael Nadal)

(हेही वाचा – David Warner Baggy Green : डेव्हिड वॉर्नरची बॅगी ग्रिन कॅप कशी मिळाली?)

दुसरा सेटही याला अपवाद नव्हता आणि नदालने ६-२ असा तो जिंकला. एकूण १ तास २३ मिनिटांत नदालने हा सामना संपवला. (Rafael Nadal)

(हेही वाचा – Jio Financial in MF : जिओ आता लाँच करणार स्वत:चे म्युच्युअल फंड)

‘मी पुन्हा या कोर्टवर उद्या खेळणार आहे, ही गोष्ट खूपच समाधान देणारी आहे. इतक्या दिवसांनी व्यावसायिक टेनिस खेळण्यासाठी उतरल्यावर सलग दोन विजय मिळवणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला तेच हवंय. विजय, आरोग्य आणि चांगला सराव,’ असं नदाल दुसऱ्या विजयानंतर म्हणाला. (Rafael Nadal)

आता पुढील फेरीत नदालची गाठ आणखी एक ऑस्ट्रेलियन खेळाडू जॉर्डन थॉमसनशी पडणार आहे. आणि तो सामनाही नदालने जिंकला तर उपांत्य फेरीत त्याची गाठ दुसरं मानांकन मिळालेल्या ग्रिगोर दिमित्रोवशी पडू शकते. (Rafael Nadal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.