Rafael Nadal is Back : स्पॅनिश ग्लॅडिएटर राफेल नदाल नवीन हंगामासाठी सज्ज

सततच्या दुखापतींमुळे शरीरावर ताण पडलेला असताना एक शेवटचा प्रयत्न राफेल नदाल करणार आहे. 

155
Rafael Nadal : बार्सिलोना ओपनमध्ये राफेल नदालचं आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात
  • ऋजुता लुकतुके

सततच्या दुखापतींमुळे शरीरावर ताण पडलेला असताना एक शेवटचा प्रयत्न राफेल नदाल (Rafael Nadal) करणार आहे. (Rafael Nadal is Back)

मागची २० वर्षं राफेल नदाल (Rafael Nadal) हा स्पॅनिश ग्लॅडिएटर टेनिसच्या नवीन हंगामासाठी तयार झाला आहे. या आठवड्यात ब्रिस्बेन इथं होणारी स्पर्धा तो खेळणार आहे. त्याने शेवटचा व्यावसायिक टेनिस (Tennis) सामना खेळून आता एका वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. त्यानंतर दुखापतींचा ससेमिरा पुन्हा एकदा सुरू झाला आणि ३७ वर्षीय नदाल टोनिस कोर्टाच्या बाहेरच राहिला. आता तो निकराचा प्रयत्न करतोय पुनरागमनाचा. (Rafael Nadal is Back)

ब्रिस्बेनमधील स्पर्धा आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन आणि पुढे फ्रेंच ओपन खेळण्याचा त्याचा विचार आहे. (Rafael Nadal is Back)

नदालची (Rafael Nadal) खेळण्याची शैली आक्रमक आहे आणि फटके खेळण्याची पद्धत जोरकस आहे. त्यामुळे त्याला त्याच्या अख्ख्या कारकीर्दीत त्याला मनगट, गुडखा आणि पायाच्या असंख्य दुखापतींशी लढावं लागलं. २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदं मिळवण्याची दैदिप्यमान कामगिरी जशी त्याने केली तशाच मोठ्या मोठ्या दुखापतीही या कारकीर्दीत झेलल्या. आणि त्यामुळे सर्वाधिक पुनरागमनही त्याने केली. (Rafael Nadal is Back)

अगदी अलीकडे २०२३ च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तो पहिल्या २ फेऱ्यांपर्यंत खेळला. त्यानंतर त्याला हीप सर्जरी करून घ्यावी लागली आणि तेव्हापासून तो स्पर्धात्मक टेनिस खेळलेला नाही. (Rafael Nadal is Back)

(हेही वाचा – Arabian Sea : अरबी समुद्राच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने पाच युद्धनौका केल्या तैनात)

नदाल (Rafael Nadal) आता निवृत्त होणार असंच त्यानंतर वाटलं. पण, नदाल (Rafael Nadal) पुन्हा एकदा निर्धाराने कोर्टवर उतरतोय. ‘दुखापतीमुळे असं बिछान्यावर पडलेला असताना मला निवृत्त व्हायचं नाही. खेळत असताना कारकीर्दीचा शेवट झालेला मला हवा आहे,’ असं नदालने अलीकडेच बोलून दाखवलं होतं. पण, कारकीर्द लांबवण्याच्या दृष्टीने तो ठरावीक स्पर्धांमध्येच खेळणार आहे. (Rafael Nadal is Back)

आधी ब्रिस्बेन आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन तो खेळणार आहे आणि त्यानंतर फ्रेंच ओपन तो खेळणार असला तरी विम्बल्डन खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे स्पर्धांची निवड करून हा हंगाम खेळण्याचा त्याचा विचार आहे. (Rafael Nadal is Back)

नदालच्या (Rafael Nadal) नावावर १४ फ्रेंच ओपन, ४ अमेरिकन ओपन, २ ऑस्ट्रेलियन तसंच २ विम्बल्डन विजेतेपदं जमा आहेत. २०२२ मध्ये त्याने शेवटची ग्रँडस्लॅम जिंकली ती फ्रेंच ओपन. ३६ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकून तो सगळ्यात वयस्क विजेता ठरला होता. (Rafael Nadal is Back)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.