Pro Kabaddi League 10 : शेवटच्या ५ मिनिटांत १४ गुण कमावत बंगळुरू बुल्सनी पाटणा पायरेट्सवर केली मात

बंगळुरू बुल्स आणि दबंग दिल्ली या संघांनी सोमवारी शानदार विजय मिळवले. 

154
Pro Kabaddi League 10 : शेवटच्या ५ मिनिटांत १४ गुण कमावत बंगळुरू बुल्सनी पाटणा पायरेट्सवर केली मात
Pro Kabaddi League 10 : शेवटच्या ५ मिनिटांत १४ गुण कमावत बंगळुरू बुल्सनी पाटणा पायरेट्सवर केली मात
  • ऋजुता लुकतुके

प्रो कबड्डी लीगचा हा दहावा हंगाम आहे. आणि अहमदाबाद, नॉयडा आणि चेन्नईनंतर कबड्डचा हा थरार मुंबापुरीत आला आहे. यंदाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. आणि त्यामुळे संघांमधील चुरसही वाढताना दिसतेय. (Pro Kabaddi League 10)

सोमवारी बंगळुरू बुल्सला डोळ्यासमोर लीगमधील आठवा पराभव दिसत होता. पाटणा पायरेट्स विरुद्ध खेळताना सामन्याची ५ मिनिटं शिल्लक होती. आणि सामन्याचा गुणफलक २३ वि ३१ असा ८ गुणांचा फरक पाटणा संघाच्या बाजूने दाखवत होता. (Pro Kabaddi League 10)

(हेही वाचा – Red Sea Crisis : लाल समुद्रातील संकटामुळे भारताला बसू शकतो ३० अब्ज अमेरिकन डॉलरचा फटका)

पाटणा संघाची चढाई होती तेव्हा बंगळुरूचे तीन खेळाडू फक्त मैदानात होते. अनुभवी सुरजीत मैदानावर होता, एवढीच जमेची बाजू होती. सुरजीतला मात्र फारशी काळजी नव्हती. आपल्या आधीच्या कितीतरी संघांना त्याने या परिस्थितीतून बाहेर काढलं होतं. बचाव हा तर त्याचा गड होता. आणि इथे त्याने तेच केलं. पाटण्याच्या पुढच्या दोन चढाईवीरांना त्याने एकट्याने पकडलं. त्याचे साथीदार मग अशाच प्रेरणेची वाट बघत होते. (Pro Kabaddi League 10)

त्यांनीही मिळालेली संधी सोडली नाही आणि पुढच्या साडेतीन मिनिटांत पाटण्यावर चक्क एक लोण चढवला. आता गुणफलक बंगळुरू संघाच्या बाजूने ३२-३१ असा झाला होता. आणि पाटण्याची पुढची चढाईही फोल गेली. बंगळुरूला एक गुण मिळाला. स्वत:च्या चढाईवर आणखी एक गुण मिळवत त्यांनी चक्क ३५-३३ असा विजय मिळवला. (Pro Kabaddi League 10)

(हेही वाचा – PM Narendra Modi : मंदिरावर वक्तव्ये करणं टाळा, आस्था ठेवा आक्रमकता नको; पंतप्रधान मोदींनी केले मंत्र्यांना आवाहन)

सुरजितने बचावाचे पाच महत्त्वाचे गुण कमावले. तर पटणा पायरेट्सकडून नीरज कुमारने चढाईचे पाच गुण मिळवले. या विजयानंतर बंगळुरू संघाने गुणतालिकेत सातवा क्रमांक पटकावला आहे. पहिले सहा संघ सुपरसिक्समध्ये जाणार आहेत. (Pro Kabaddi League 10)

सोमवारच्या दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्ली संघाने यु मुंबाचा ४०-३४ असा पराभव केला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांमध्ये चुरस होती. आणि गुणही समसमान होते. पण, मुंबईने मोक्याच्या क्षणी चुका केल्या. त्या त्यांना भोवल्या. (Pro Kabaddi League 10)

आशू मलिक दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यालाच दमदार चढायांसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तर दिल्लीतर्फे योगेशनेही बचावाचे ४ गुण मलिकला चांगली साथ दिली. दबंग दिल्ली संघाचे आता ४० गुण झाले आहेत. आणि ते पुणे पलटनच्या मागोमाग दुसऱ्या स्थानावर आहेत. तर मुंबईचा संघ पाचव्या स्थानावर आहे. (Pro Kabaddi League 10)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.