PCB vs Cricket Sri Lanka : आशिया चषकातील महसूलावरून पाक आणि श्रीलंकन क्रिकेट बोर्डांमध्ये जुंपली

गेल्यावर्षी झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील महसूल वाटून घेण्यावरून पाकिस्तान आणि श्रीलंकन क्रिकेट संघांदरम्यान वाद सुरू झाल्याचं समजतंय. ही स्पर्धा सुरुवातीला एकट्या पाकिस्तानमध्ये होणार होती. पण, भारतीय संघाने सुरक्षिततेच्या कारणावरून पाकमध्ये खेळायला नकार दिला.

151
PCB vs Cricket Sri Lanka : आशिया चषकातील महसूलावरून पाक आणि श्रीलंकन क्रिकेट बोर्डांमध्ये जुंपली
  • ऋजुता लुकतुके

गेल्यावर्षी झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील महसूल वाटून घेण्यावरून पाकिस्तान आणि श्रीलंकन क्रिकेट संघांदरम्यान वाद सुरू झाल्याचं समजतंय. ही स्पर्धा सुरुवातीला एकट्या पाकिस्तानमध्ये होणार होती. पण, भारतीय संघाने (Indian team) सुरक्षिततेच्या कारणावरून पाकमध्ये खेळायला नकार दिला. त्यानंतर तोडगा असा निघाला की, भारताचे सामने श्रीलंकेत व्हावेत. पण, हे सामने श्रीलंकेत हलवल्यामुळे स्पर्धेसाठीच्या खर्चात ३ ते ४ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी वाढ झाली. आणि हा खर्च कुणी उचलायचा यावरून हा वाद सुरू आहे. (PCB vs Cricket Sri Lanka)

खेळाडू आणि इतरांसाठीचं हॉटेल बुकिंग, स्पर्धेसाठी मैदान तयार करणं तसंच त्याचा खर्च स्थानिक क्रिकेट असोसिएशनला देणं, प्रवासाचा खर्च अशा गोष्टी अतिरिक्त कराव्या लागल्या. गेल्या आठवड्यात बाली इथं आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक झाली. आणि यात श्रीलंकन क्रिकेटनं (Cricket Sri Lanka) आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. ‘आम्ही अधिकृतपणे यजमान नव्हतो. शिवाय या आयोजनातून आम्हाला कुठलाही अतिरिक्त नफा झाला नाही. त्यामुळे या सामन्यांच्या आयोजनाचा खर्च उचलण्याची आमची तयारी नाही,’ असं श्रीलंकन मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं. (PCB vs Cricket Sri Lanka)

(हेही वाचा – Ind vs Eng Test Series : दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लिश संघ सुट्टीसाठी आबूधाबीला रवाना)

आशिया चषकाचे काही सामने श्रीलंकेतही झाले होते

तर पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही (PCB) अतिरिक्त खर्च आशियाई क्रिकेट परिषदेनं करावा अशी भूमिका मांडली आहे. पाक क्रिकेट मंडळाचे तेव्हाचे झका अश्रफ यांनी अंतिम सामन्याचं ठिकाण ऐनवेळी लाहोरहून मुलतानला हलवलं. त्यामुळे त्यांचाही खर्च वाढला. पण, श्रीलंकन बोर्डाच्या मागणीवर पाक बोर्डाचं म्हणणं आहे की, ‘त्यांची आयोजनाची तयारी असताना आशियाई परिषदेनं हे सामने त्यांच्याकडून काढून श्रीलंकेला दिले. तेव्हा हा अतिरिक्त भार आशियाई परिषदेनं उचलला पाहिजे.’ (PCB vs Cricket Sri Lanka)

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह आहेत. आणि त्यांनी पाक क्रिकेट मंडळाकडेच बोट दाखवल्याचं समजतंय. अख्खी स्पर्धा श्रीलंकेत भरवण्याचं ठरत असताना पाकिस्तान मंडळाने इतर सामने पाकिस्तानमध्ये भरवण्याचा आग्रह धरला. त्यामुळे हा अतिरिक्त खर्च झाल्याचं शाह यांनी पाकिस्तानला सांगितल्याचं समजतंय. स्पर्धेदरम्यान झालेला हॉटेल आणि विमान प्रवासाचा खर्च यांची काही बिलं अजून थकित आहेत. आणि त्यावरून हा वाद सुरू झाला. पाक बोर्डाने काही बिलं देऊ केली आहेत. पण, यजमानपदासाठी असलेली २.५ दशलक्ष अमेरिकन डॉलरची फी आशियाई परिषदेनं भरावी अशी विनंती पाक बोर्डाने केली आहे. (PCB vs Cricket Sri Lanka)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.