Paris Olympic 2024 : बजरंग पुनिया, रवी दाहिया ऑलिम्पिक शर्यतीतून बाहेर 

Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकसाठीच्या ट्रायल्समध्ये झालेल्या पराभवानंतर बजरंग आणि दाहिया यांची ऑलिम्पिर संधी हुकली आहे

100
Paris Olympic 2024 : बजरंग पुनिया, रवी दाहिया ऑलिम्पिक शर्यतीतून बाहेर 
Paris Olympic 2024 : बजरंग पुनिया, रवी दाहिया ऑलिम्पिक शर्यतीतून बाहेर 
  • ऋजुता लुकतुके

टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics) पदक विजेते खेळाडू बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि रवी दाहिया पॅरिस ऑलिम्पिकच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. कुस्तीचा कारभार हाकणाऱ्या तात्पुकत्या समितीने हरयाणात सोनपत इथं निवड चाचणी स्पर्धा भरवली होती. आणि यातून पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड होणार होती. पण, या स्पर्धेत बजरंग आणि दाहिया यांनी आपापले सामने गमावल्यामुळे ऑलिम्पिकचं दोघांचं स्वप्न भंगणार आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Litton Das Run – Out : लिट्टन दासच्या धावचीतची होतेय धोणीच्या धावचीतशी चर्चा )

पुनिया मागचं वर्षभर कुस्ती फेडरेशनचे तेव्हाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्याविरुद्धच्या आंदोलनात गुंतला होता. बजरंगने साक्षी आणि विनेश फोगाट या आघाडीच्या कुस्तीपटूंबरोबर नवी दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलनही केलं. चाचणी स्पर्धेत बजरंगने आपला सामना ९-१ ने गमावला. ६५ किलो वजनी गटात रोहीत कुमारने त्याचा पराभव केला. (Paris Olympic 2024)

या पराभवानंतर बजरंग पुनियाने तातडीने स्पर्धेचं ठिकाण सोडलं. खेळाडूंसाठी अनिवार्य असलेली उत्तेजक द्रव्य चाचणीही त्याने दिली नाही. खरंतर या स्पर्धेच्या तयारीसाठी बजरंगने अलीकडे रशियात जाऊन सराव केला होता. पण, निवड चाचणीत त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Russia Ukraine War : पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपानंतर पुतीन यांनी बदलला युद्धाचा निर्णय)

टोकयो ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलेला रवी दाहियाही निवड चाचणी स्पर्धेत पराभूत झाला आहे. अमन सेहरावत या युवा कुस्तीपटूबरोबरचा सामना शेवटपर्यंत रंगला. आणि या सामन्यात दाहियाचा १३-१४ असा पराभव झाला. दाहियाने या सामन्यात शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण, शेवटच्या क्षणी अमनने डाव टाकून २ गुण मिळवले आणि हा सामना जिंकला. या पराभवानंतर दाहियाची पुढील लढत आशियाई विजेता उदितशी होती. पण, या सामन्यातही पराभव झाल्यानंतर रवी दाहियाचं आव्हान संपुष्टात आलं. (Paris Olympic 2024)

या निवड चाचणी स्पर्धेत विजेतेपद पटकावलेले खेळाडू आशियाई आणि जागतिक स्तरावरील ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळतील. आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकसाठी अमित पनघळ हा एकमेव भारतीय कुस्तीपटू पात्र ठरला आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.