Litton Das Run – Out : लिट्टन दासच्या धावचीतची होतेय धोणीच्या धावचीतशी चर्चा 

Litton Das Run - Out : लिट्टन दासने यष्टीकडे न बघता केलेल्या धावचीतमुळे त्याची तुलना महेंद्रसिंग धोणीशी होतेय

129
Litton Das Run - Out : लिट्टन दासच्या धावचीतची होतेय धोणीच्या धावचीतशी चर्चा 
Litton Das Run - Out : लिट्टन दासच्या धावचीतची होतेय धोणीच्या धावचीतशी चर्चा 
  • ऋजुता लुकतुके

२०१६ मध्ये न्यूझीलंडच्या मालिकेत महेंद्रसिंग धोणीने (MS Dhoni) रॉस टेलरला धावचीत केलेला क्षण आठवतोय? धोणी तेव्हा ३५ वर्षांचा होता. टेलर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांत होता. आणि धोणीने क्षेत्ररक्षकांनी फेकलेला चेंडू एका टप्प्यानंतर झेलला. आणि मागे यष्टीकडे न बघता चेंडू यष्टीच्या दिशेनं फेकला. ती फेक अचूक ठरली आणि टेलर धावचीत झाला. तेव्हा धोणीच्या या धावचीतची खूप चर्चा झाली होती. आणि आताही सर्वोत्तम धावचीत उदाहरणांमध्ये धोणीची कामगिरी धरली जाते.  (Litton Das Run – Out)

(हेही वाचा- Ind vs Eng Test Series : युवा खेळाडूंनी शक्य केला भारताचा आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानाचा प्रवास)

याच कामगिरीची पुनरावृत्ती ८ वर्षांनंतर श्रीलंका विरुद्ध बांगलादेश टी-२० सामन्यात पहायला मिळाली. श्रीलंकेविरुद्धच्या सिलहेट टी-२० सामन्यात बांगला यष्टीरक्षक लिट्टन दासने दासून शनाकाला त्याचपद्धतीने बाद केलं. मुस्तफिझुर रहमानचा चेंडू शनाकाने लाँग ऑनला टोलवला. रिशादकडून आलेली फेक अचूक नव्हती. पण, मागे झुकून लिट्टन दासने चेंडू ताब्यात घेतला. आणि मागे न पाहता त्याने क्षणात चेंडू यष्टीच्या दिशेनं फेकला. आणि शनाका चक्क धावबाद झाला. (Litton Das Run – Out)

श्रीलंकन डावाचा तो शेवटचा चेंडू होता. लिट्टनला हा चेंडू घेण्यासाठी झेप घेऊन एका बाजूला झुकावं लागलं. पण, चेंडू हातात आल्या आल्या त्याने तो यष्टीकडे फेकला. मालिकेतील हा शेवटचा तिसरा टी-२० सामना होता. आणि श्रीलंकेनं तो २८ धावांनी जिंकत ही मालिकाही २-१ ने जिंकली. यानंतर या दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरा होणार आहे. आणि पहिला एकदिवसीय सामना बुधवारी चितगावला होणार आहे. (Litton Das Run – Out)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.