Vastad 2024 : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘राज्यस्तरीय वस्ताद २०२४’ स्पर्धेचे आयोजन

खासदार संजय राऊत, सचिन अहिर यांची प्रमुख उपस्थिती 

141
Vastad 2024 : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 'राज्यस्तरीय वस्ताद २०२४' स्पर्धेचे आयोजन
Vastad 2024 : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 'राज्यस्तरीय वस्ताद २०२४' स्पर्धेचे आयोजन

हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाच्या वतीने ‘राज्यस्तरीय वस्ताद २०२४’ (बॉडी शो) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena, UBT Group), पुणे संपर्क प्रमुख आमदार सचिन आहीर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी संजय राऊत यांना ‘वस्ताद’ (Vastad 2024) या किताबाने संन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते बाळासाहेब भांडे यांनी दिली. (Vastad 2024)

(हेही वाचा – Sanatan Sanstha : सनातन संस्थेचा ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्कार देऊन सन्मान)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (UBT) युवा सरपंच मयूर भांडे यांच्या वतीने एम. बी. फाऊंडेशनच्या माध्यमातून येत्या १८ फेब्रुवारीला शिव छत्रपती क्रीडा नगरी जवळ महाळूंगे, पुणे येथे संध्याकाळी ७ वाजता ही स्पर्धा होणार आहे. यावेळी पुणे शहरातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदाचंद्र पवार या पक्षातील नेते उपस्थित राहणार असल्याचे भांडे यांनी सांगितले. (Vastad 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.