Olympic 2036 Bid : २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी गुजरातमध्ये ६,००० कोटींची स्टेडिअम उभारणार

२०३६ चं ऑलिम्पिक अहमदाबाद इथं व्हावं यासाठी गुजरात सरकारने आता जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. 

177
Olympic 2036 Bid : २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी गुजरातमध्ये ६,००० कोटींची स्टेडिअम उभारणार
Olympic 2036 Bid : २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी गुजरातमध्ये ६,००० कोटींची स्टेडिअम उभारणार
  • ऋजुता लुकतुके

गुजरातमध्ये ऑलिम्पिक आयोजन शक्य व्हावं यासाठी गुजरात सरकारने अलीकडेच गुजरात ऑलिम्पिक आयोजन पायाभूत सुविधा उभारणी लिमिटेड या नावाने एक कंपनी स्थापन केली आहे. आणि या कंपनीने आता अहमदाबाद शहरात ६००० कोटी रुपयांची गुंतवणूक करायचं ठरवलं आहे. या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. (Olympic 2036 Bid)

व्हायब्रंट गुजरात ट्रेड शो बुधवार (१० जानेवारी) पासून सुरू झाला आहे. आणि या शोमध्ये कंपनीने आपला एक स्टॉल उभारला आहे. यात कंपनीची पुढची दिशा त्यांनी स्पष्ट केली आहे. अहमदाबादच्या मोटेरा भागात सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव उभारणं हे या कंपनीसमोरचं पहिलं उद्दिष्ट आहे. ३५० एकर जागेवर उभं राहणारं हे स्टेडिअम जगातील सर्वात जास्त प्रेक्षक एकावेळी बसू शकतील अशा क्षमतेचं संकुल आहे. (Olympic 2036 Bid)

(हेही वाचा – lakshadweep : लक्षद्वीपमध्ये उभारणार नवीन विमानतळ; संरक्षक, व्यावसायिक विमाने उतरवणार)

३५० एकर जागा विकसित करणार 

आणि या संकुलातील इतर स्टेडिअम उभारण्यासाठी इच्छूक कंपन्यांकडून कंत्राटं मागवण्यात येत आहेत. (Olympic 2036 Bid)

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात ऑलिम्पिक भरवण्याचं स्वप्न पाहिलं आहे. आणि त्यादृष्टीने देशात पायाभूत सुविधा म्हणजे स्टेडिअम उभारणं हे पहिलं काम असेल. आम्ही त्या दृष्टीने अहमदाबाद शहराजवळची ३५० एकर जागा विकसित करत आहोत. आणि इथं क्रीडा संकुल उभारण्यासाठी आम्ही सध्या योजना तयार करत आहोत,’ असं व्हायब्रंट गुजरात शोमध्ये सहभागी झालेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. (Olympic 2036 Bid)

(हेही वाचा – Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाड इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपर्यंत तंदुरुस्त होणार)

अजून ऑलिम्पिक आयोजनाचा दावा नाही 

गृहमंत्री अमित शाह यांनीही डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये जाऊन कंपनीबरोबर २ बैठका घेतल्या होत्या. कारण, ऑलिम्पिकसाठी आयोजनाचा दावा करायचा असेल तर आधी पायाभूत सुविधा उभारणीपासून सुरुवात करावी लागणार आहे. (Olympic 2036 Bid)

भारत किंवा अहमदाबादने अजून ऑलिम्पिक आयोजनाचा दावा केलेला नाही. सध्या फक्त २०३२ च्या ऑलिम्पिक आयोजनाची प्रक्रिया आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून पूर्ण झाली आहे. आणि पुढील प्रक्रिया सुरूही झालेली नाही. पण, यजमानपदाचा दावा करण्यापूर्वी स्टेडिअमचं बांधकाम झालेलं असणं बंधनकारक आहे. (Olympic 2036 Bid)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.