International Hindi Day: आंतरराष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त गुगलचा ‘प्रकल्प वाणी’, इतर भाषांचाही डेटासेट तयार करणार

भारतातील २२ भाषांचा वापर करून इतरांना तंत्रज्ञानाद्वारे सहज जोडता येईल तसेच ऑनलाईन शिक्षण, आरोग्य सेवा यासारख्या अनेक जीवनरक्षक वेब सेवा वापरण्यास कोणतीही अडचण नाही.

73
International Hindi Day: आंतरराष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त गुगलचा 'प्रकल्प वाणी', इतर भाषांचाही डेटासेट तयार करणार
International Hindi Day: आंतरराष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त गुगलचा 'प्रकल्प वाणी', इतर भाषांचाही डेटासेट तयार करणार

भारताचं भाषा वैविध्य हे गुगलसाठी आव्हान आहे. त्याकरिता गुगल एक दशकाहून अधिक काळ भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हिंदीचे वाढते वर्चस्व पाहता गुगलने ‘प्रोजेक्ट वाणी’ सुरू केला आहे. (International Hindi Day)

भारतातील २२ भाषांचा वापर करून इतरांना तंत्रज्ञानाद्वारे सहज जोडता येईल तसेच ऑनलाईन शिक्षण, आरोग्य सेवा यासारख्या अनेक जीवनरक्षक वेब सेवा वापरण्यास कोणतीही अडचण नाही. भारतातील लाखो लोक ९ भारतीय भाषांमध्ये ‘सर्च’, ‘मॅप’ आणि ‘असिस्टंट’सारखी गुगलची साधने वापरतात.जी-बोर्ड ६० भारतीय भाषांमध्ये टायपिंगला सपोर्ट करते आणि १० भारतीय भाषांमध्ये व्हॉइस टायपिंगची सुविधादेखील देते.

आतापर्यंत ८0 जिल्ह्यांतील ३८ भाषांमध्ये ५००० तासांचा डेटा संकलित

गुगलने तंत्रज्ञानात सुधारणा करून भाषेबाबत बरेच काम केले असल्याचे सांगितले आहे. २०२२मध्ये एआय मॉडेल म्युरलने भारतीय भाषा समजणे खूप सोपे केले. आतापर्यंत ८० जिल्ह्यांतील ३८ भाषांमध्ये ५००० तासांचा डेटा संकलित केला आहे. याच्या मदतीने विकासक भारतीय भाषांवर आधारित स्पीच रेकग्निशन अॅपलिकेशन्स तयार करत आहेत. यामुळे एआयमधील ‘प्रकल्प वाणी’ लाखो लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती गुगलकडून देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.