Neeraj Chopra Diamond League : नवा जगज्जेता नीरजला कायम राखायचाय विजयाचा धडाका

Neeraj Chopra Diamond League : पहिल्यांदाच जगज्जेतेपद पटकावल्यानंतर आता नीरज चोप्राला झ्युरिचमध्ये पुढच्या स्पर्धेतही सुवर्ण पटकावायचं आहे. ‘विजयाचा धडाका’ कायम ठेवायचाय असं तो म्हणतो

162
Neeraj Chopra Diamond League : नवा जगज्जेता नीरजला कायम राखायचाय विजयाचा धडाका
Neeraj Chopra Diamond League : नवा जगज्जेता नीरजला कायम राखायचाय विजयाचा धडाका

ऋजुता लुकतुके

मागच्याच रविवारी नीरज चोप्राने बुडापेस्ट इथे भालाफेकीत आपलं पहिलं विश्वविजतेपद पटकावलं. (Neeraj Chopra Diamond League) त्यासाठी अंतिम फेरीत त्याने ८८.१७ मीटरवर भाला फेकला. या विजयानंतर नीरजची भूक आता वाढलीय. ॲथलेटिक्समध्ये मानाच्या डायमंड लीगमध्येही विजयासाठीच प्रयत्न करणार असा निर्धार त्याने बोलून दाखवला आहे. गुरुवारपासून झ्युरिच इथं डायमंड लीग सुरू होत आहे.

गेल्यावर्षी या स्पर्धेत नीरजला रौप्य पदक मिळालं होतं. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर नीरजने एक अजोड कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक आणि अजिंक्यपद अशा दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या फक्त तीन खेळाडूंमध्ये आता त्याचा समावेश आहे. अशी कामगिरी फारशी कुणाला करता आलेली नाही. नॉर्वेचा आंद्रियास थोर्किलसेन आणि झेक रिपब्लिकचा जॅन झेलेझ्नी या दोघांनीच आतापर्यंत अशी कामगिरी केली आहे. त्यांच्या पंक्तीत आता नीरज जाऊन बसला आहे. (Neeraj Chopra Diamond League)

(हेही पहा – Rice Exports : निर्याती बंदी असूनही ‘या’ देशांना पाठवणार तांदूळ)

यापैकी झेलेझ्नीच्या नावावर भालाफेकीचा सध्याचा विश्वविक्रमही आहे. याशिवाय झेलेझ्नीच्या नावावर तीन ऑलिम्पिक सुवर्ण आहेत. विश्व अजिंक्यपद स्पर्धाही त्याने तीनदा जिंकलीय. तर थोर्किलसेनच्या नावावर दोन ऑलिम्पिक सुवर्ण आहेत. आणि दोघांची सर्वोत्तम भालाफेक ९० मीटरच्या पुढे आहे.

याउलट, २५ वर्षीय नीरज चोप्राही या हंगामात फॉर्मात आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी त्याने डायमंड लीगची दोहा (५ मे) आणि लुझान (३० जून) अशी दोन विजेतेपदं पटकावली आहेत. या हंगामात तो अपराजित आहे. पण, नीरजला आता पॅरिस ऑलिम्पिक पूर्वी ९० मीटरची झेप घ्यायची आहे. ही आकांक्षा त्याने वारंवार बोलून दाखवली आहे.

झ्युरिचमध्ये नीरजचे तगडे प्रतिस्पर्धी असतील जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि झेक रिपब्लिकचा जेकब वादलेज. तसंच अँडरसन पीटर्सशीही त्याचा मुकाबला असेल. अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य जिंकलेला पाकिस्तानचा अर्शद नदीम झ्युरिचमधील स्पर्धेत खेळत नाहीए.

कसा असेल डायमंड लीगचा प्रवास ?

ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात डायमंड्स लीगचे वर्षभरात काही टप्पे असतात. यंदा सहा डायमंड लीग स्पर्धांमध्ये भालाफेकीचा समावेश आहे. आणि या लीगची शेवटची स्पर्धा युजिन (अमेरिका) इथं सप्टेंबर महिन्यात होणार आहे. प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या स्पर्धेमधून पहिल्या तीन क्रमांकांना पदकांबरोबरच खेळाडूंना क्रमवारीनुसार गुण देण्यात येतात. आणि सर्वोत्तम गुण मिळवणारे वरचे सहा भालाफेकपटू शेवटच्या टप्प्यातल्या अंतिम स्पर्धेत खेळतात.

या हंगामात नीरजने आतापर्यंत दोन डायमंड लीग टप्प्यांमध्ये सहभाग नोंदवला आहे. आणि दोहा तसंच लुझानमधील या दोन्ही स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत. त्यामुळे त्याच्या खात्यात १६ गुण जमा झाले आहेत. डायमंड लीगच्या क्रमवारीत तो सध्या तिसरा आहे. वादलेज (३ टप्प्यांमधून २१ गुण) आणि वेबर (३ टप्प्यांमधून १९ गुण) हे दोन खेळाडू त्याच्या वर आहेत.

गेल्यावर्षी म्हणजे २०२२ मध्ये डायमंड लीगची अंतिम फेरी झ्युरिचमध्ये झाली होती. आणि ती नीरज चोप्राने जिंकली होती. टेनिसमध्ये ग्रँडस्लॅम, बॅडमिंटनमध्ये सुपरसीरिज तसंच महत्त्व ॲथलेटिक्समध्ये डायमंड लीगला आहे. (Neeraj Chopra Diamond League)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.