Rice Exports : निर्याती बंदी असूनही ‘या’ देशांना पाठवणार तांदूळ

सिंगापूर, इंडोनेशिया आणि फिलीपिन्स यांच्याकडून भारताला तांदूळ निर्यात बंदीतून सूट देण्याचे आवाहन

124
Rice Exports : निर्याती बंदी असूनही 'या' देशांना पाठवणार तांदूळ
Rice Exports : निर्याती बंदी असूनही 'या' देशांना पाठवणार तांदूळ

गेल्या 2 महिन्यांत देशात पुन्हा एकदा महागाई वाढू लागली आहे. सरकारने प्रति मेट्रिक टन 1,200 डॉलरपेक्षा कमी किंमत असलेल्या बासमती तांदळाच्या निर्यातीवर (Rice Exports) बंदी घातली आहे. आता निर्यातदार या दराने केवळ महागडा बासमती तांदूळ देशाबाहेर पाठवू शकणार आहेत. याआधीही सरकार वेळोवेळी तांदळाच्या निर्यातीवर विविध प्रकारचे निर्बंध लादले होते.

जुलै महिन्यात महागाई 7 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत. गेल्या आठवड्यात सिंगापूर, इंडोनेशिया आणि फिलीपिन्सने भारताला तांदूळ निर्यात बंदीतून (Rice Exports) सूट देण्याचे आवाहन केले होते. आता भारताने सिंगापूरला तांदूळ निर्यात करण्याला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा : Raksha Bandhan Special: जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळेत ‘सैनिकांसाठी एक राखी’उपक्रम)

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सिंगापूरसोबतचे विशेष संबंध लक्षात घेऊन भारताने अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तांदूळ निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “भारत आणि सिंगापूर यांच्यात सामायिक हितसंबंध, आर्थिक संबंध आणि दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारी आहे.”

हे विशेष संबंध लक्षात घेऊन सिंगापूरच्या अन्नसुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताने तांदूळ निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील औपचारिक आदेश लवकरच जारी करण्यात येणार आहेत. सिंगापूर, इंडोनेशिया आणि फिलिपाइन्सप्रमाणेच भूतान आणि मॉरिशसनेही भारताला निर्यातबंदी माफ करण्याची विनंती केली होती. ऑगस्टच्या सुरुवातीला भूतानने भारताकडे तांदळाची मागणी केली होती. अहवालानुसार, भारत मदत म्हणून भूतानला 79,000 टन गैर-बासमती पांढरा तांदूळ निर्यात करेल. भारत 14,000 टन बिगर बासमती पांढरा तांदूळ मॉरिशसला पाठवणार असल्याचेही सांगण्यात आले. तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार, भारत सुमारे 125 देशांमध्ये तांदूळ निर्यात करतो.

सरकारने बासमती तांदळाच्या निर्यातीवरही काही निर्बंध लादले आहेत. 27 ऑगस्ट रोजी सरकारने सांगितले की 1,200 डॉलर प्रति टन दराने बासमती तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली जाणार नाही. जुलैमध्ये, भारत सरकारने बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याची बातमी आल्यावर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इत्यादी देशांमध्ये लोकांनी घाबरून तांदूळ खरेदी करण्यास सुरुवात केली. तांदूळ लवकरच महाग होणार अशी चर्चा लोकांमध्ये पसरली. बिगर बासमती पांढऱ्या तांदळावरील बंदीमुळे जागतिक स्तरावर तांदळाच्या किंमतीत वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये तांदळाचा तुटवडा निर्माण झाला असून तांदळाच्या किंमती वाढल्याने ते चिंतेत आहेत. (Rice Exports)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.