National Games 2023 : गोव्यातील राष्ट्रीय खेळांत खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचा सुवर्णाचा डबल-बार

गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय खेळांत खो खो प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी सुवर्ण पदक पटकावलं आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांची ही विजयाची हॅट-ट्रीक आहे.

65
National Games 2023 : गोव्यातील राष्ट्रीय खेळांत खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचा सुवर्णाचा डबल-बार
National Games 2023 : गोव्यातील राष्ट्रीय खेळांत खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचा सुवर्णाचा डबल-बार
  • ऋजुता लुकतुके

गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय खेळांत खो-खो प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी सुवर्ण पदक पटकावलं आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांची ही विजयाची हॅट-ट्रीक आहे. (National Games 2023)

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या खो-खो विभागात महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी ओडिशाच्या दोन्ही संघांना दणका देत प्रथमच हॅटट्रिकसह दुहेरी सुवर्ण पदकाचा बार उडवून दिला आहे. खरतर महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी स्पर्धेच्या सुरवातीपासूनच मोठे विजय साजरे करत सुवर्ण पदकाचे दावेदार असल्याचे दाखवून दिले होते. यापूर्वी केरळ येथे झालेल्या २०१५ सालच्या स्पर्धेत व त्यानंतर झालेल्या २०२२ च्या गुजरात स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी सुवर्ण पदक मिळवले होते व आता गोवा येथे हॅटट्रिक साजरी केली. (National Games 2023)

पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशाचा ७२-२६ (मध्यंतर ३६-१२) असा धुव्वा उडवला. सामन्यात सुरवातीपासूनच महाराष्ट्राने वर्चस्व राखले होते. सुयश गरगटेने २ मि. संरक्षण करून ६ गुण मिळवले, फैझांखा पठाणने २ मि. संरक्षण करून ८ गुण मिळवले, वृषभ वाघने २ मि. संरक्षण केले. (National Games 2023)

तर कर्णधाराची खेळी करताना रामजी कश्यपने १ मि. संरक्षण करून तब्बल १२ गुण वसूल केले. आदित्य गणपुलेने १:५० मि. संरक्षण करून ४ गुण मिळवले व मोठा विजय निश्चित केला. तर पराभूत ओडिशाच्या विशाल ओरामने १.३० मि. संरक्षण करून ४ गुण मिळवले तर अर्जुन सिंघने १ मि. संरक्षण करून ६ गुण मिळवत दिलेली लढत अपुरी ठरली. (National Games 2023)

(हेही वाचा – Rs 60 Lakh Job : लिंक्डइनवरून ६० लाख रुपयांची पगाराची ऑफर मिळवणारी मुसकान अगरवाल कोण आहे?)

महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर ४६-४० असा दणदणीत विजय साजरा केला. महाराष्ट्राच्या प्रियंका इंगळेने २.१०, १.३० मि. संरक्षण करत ८ गुणांची कमाई केली, प्रियांका भोपीने १.२२, १.५० मि. संरक्षण करत ४ गुण मिळवले. काजल भोरने आक्रमणात ८ गुण वसूल केले, गौरी शिंदेने १.२८ मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. (National Games 2023)

पराभूत ओडिशाच्या माधुमिताने १.३६ मि. संरक्षण करत तब्बल १० गुण वसूल केले तर रंजिताने १.०८ मि संरक्षण करत ४ गुण मिळवत जोरदार लढत दिली मात्र महाराष्ट्राने त्याची डाळ शिजू दिली नाही. पुरुषामध्ये केरळ व आंध्र प्रदेश तर महिलांमध्ये कर्नाटक व केरळ तिसऱ्या क्रमांकावर राहिले. पुरुषांचे प्रशिक्षक डलेश देसाई व महिलांचे प्रशिक्षक नरेंद्र मेंगळ यांनी दुहेरी सुवर्णपदकाची हॅटट्रिक करू शकलो याबद्दल आनंद व्यक्त केला. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ह्या मॅटवर हॉत आहेत आणि महाराष्ट्राचा पारंपरिक खो-खो खेळ आता कात टाकतो आहे. अलीकडेच खोखोच्या लीगचीही चर्चा झाली होती. (National Games 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.