Govardhan Puja 2023 : गोवर्धन पूजा कशी करावी ? जाणून घ्या यंदाचा मुहूर्त…

गोवर्धन पूजेच्या दिवशी लोक घराच्या अंगणात किंवा घराबाहेर गोमयापासून गोवर्धन पर्वत बनवून त्याची पूजा करतात. या दिवशी भगवान कृष्णाला विविध प्रकारचे खाद्यपदार्थ अर्पण केले जातात.

122
Govardhan Puja : गोवर्धन पूजा कशी करावी ? जाणून घ्या यंदाचा मुहूर्त...

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा साजरी केली जाते. (Govardhan Puja) दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. गोवर्धन पूजा ही ‘अन्नकूट पूजा’ म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी भगवान गणेश आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी लोक घराच्या अंगणात किंवा घराबाहेर गोमयापासून गोवर्धन पर्वत बनवून त्याची पूजा करतात. या दिवशी भगवान कृष्णाला विविध प्रकारचे खाद्यपदार्थ अर्पण केले जातात. गोवर्धन पूजा, तिची तारीख आणि महत्त्व यांविषयी पाहूया ! (Govardhan Puja)

यावर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल प्रतिपदा सोमवार, 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:56 वाजता सुरू होत आहे. ही तिथी 14 नोव्हेंबर, मंगळवारी दुपारी 2:36 वाजता संपेल. यंदा मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजा साजरी केली जाईल. (Govardhan Puja)

(हेही वाचा – National Games 2023 : गोव्यातील राष्ट्रीय खेळांत खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचा सुवर्णाचा डबल-बार)

गोवर्धन पूजेचा मुहूर्त
  1. गोवर्धन पूजेचा मुहूर्त यंदा मंगळवार, 14 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 6:43 ते 08:52 पर्यंत आहे.
  2. २०२३ मध्ये गोवर्धन पूजेच्या दिवशी शुभ योग आहे.
  3. गोवर्धन पूजेच्या दिवशी सकाळी 1 ते दुपारी 1.57 पर्यंत शोभन योग आहे. त्यानंतर अतिगंड योग चालू होत आहे. अतिगंड योग शुभ मानला जात नाही. मात्र, शोभन योग शुभ योग मानला जातो.
  4. गोवर्धन पूजेच्या दिवशी सकाळपासून अनुराधा नक्षत्र असेल.
  5. या दिवशी सकाळी लवकर उठावे.
  6. शुभ मुहूर्ताच्या काळात गायीच्या शेणाने गिरीराज गोवर्धन पर्वत आणि पशुधन म्हणजेच गाय, वासरू बनवावे.
  7. भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला दुधाने अभिषेक घालावा.
  8. यानंतर धूप दाखवून आणि दिवा लावून यथासांग पूजा करावी.
  9. अन्नकुटाचा नैवेद्य दाखवावा.
  10. गिरीराज गोवर्धन पर्वत आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करावी.

हिंदू पौराणिक कथांनुसार, गोवर्धन पूजेची सुरुवात भगवान कृष्णाने केली होती. भगवान कृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला. त्याने वृंदावनातील गोप-गोपींचे आणि पशुधनाचे भगवान इंद्राच्या क्रोधापासून रक्षण केले. त्यामुळे गोवर्धन पूजेत गिरिराज गोवर्धन पर्वतासोबत कृष्णाची पूजा करण्याची रूढी आहे. या दिवशी अन्नकुटाला विशेष महत्त्व आहे.  (Govardhan Puja 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.