Mumbai Stunned by UP : रणजी स्पर्धेत मुंबईवर उत्तर प्रदेशचा २ गडी राखून विजय

आधीच्या ४ सामन्यांत निर्णायक विजय मिळवणाऱ्या मुंबईचा दुबळ्या उत्तर प्रदेशकडून पराभव झाला. 

178
Mumbai Stunned by UP : रणजी स्पर्धेत मुंबईवर उत्तर प्रदेशचा २ गडी राखून विजय
  • ऋजुता लुकतुके

उत्तर प्रदेशने चिवट फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत ४१ वेळा रणजी करंडक जिंकलेल्या मुंबई संघाचा २ गडी राखून पराभव केला आहे. आर्यन जुयलच्या ७६ तर करण शर्माच्या ६७ धावांच्या खेळीमुळे उत्तर प्रदेशला हा विजय शक्य झाला. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १०३ धावांची भागिदारी केली. आणि उत्तर प्रदेशच्या विजयाची पायाभरणी केली. (Mumbai Stunned by UP)

त्यापूर्वी मुंबईचा दुसरा डाव ८ बाद ३०३ वरून ३२० धावांत गुंडाळला गेला. आणि उत्तर प्रदेशसमोर १९५ धावांचं आव्हान होतं. (Mumbai Stunned by UP)

(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून रवींद्र जडेजा आणि के एल राहुलची माघार)

हे आव्हानही मुंबईच्या फिरकी गोलंदाजांनी उत्तर प्रदेश संघासाठी कठीण करून ठेवलं होतं. तनुष कोटियन एका बाजूने नियमितपणे बळी टिपत होता. आणि ५८ धावांत त्याने ५ बळी मिळवलेही. पण, करण शर्माने शेवटपर्यंत एक बाजू लावून धरली आणि १७३ चेंडूंचा सामना करत ६७ धावा केल्या. त्याने आपली विकेट फेकली नाही. आणि अखेर अकीब खानच्या मदतीने संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. उत्तर प्रदेशला निर्णायक विजयाचे ६ गुण यातून मिळाले. शेवटी उत्तर प्रदेशने ७० षटकांमध्ये ८ बाद १९५ धावा केल्या. (Mumbai Stunned by UP)

रणजी करंडक स्पर्धेत इतर दोन सामन्यांमध्ये आंध्रप्रदेशनं छत्तीसगडवर निर्णायक विजय मिळवला. तर बिहारने केरळ विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे ३ गुण मिळवले. (Mumbai Stunned by UP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.