Mohammed Shami Injury Update : मोहम्मद शामी इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन कसोटींना मुकणार

विश्वचषक गाजवलेला स्टार गोलंदाज महम्मद शामी इंग्लंडविरुद्घच्या कसोटी मालिकेत नक्की खेळेल की नाही हे अजून निश्चित नाही

175
Mohammed Shami Injury Update : मोहम्मद शामी इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन कसोटींना मुकणार
Mohammed Shami Injury Update : मोहम्मद शामी इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन कसोटींना मुकणार
  • ऋजुता लुकतुके

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर लगेचच २५ जानेवारीपासून इंग्लंड संघाचा भारत दौरा सुरू होतोय. आणि यात तब्बल पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. मायदेशात होत असलेली ही मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. पण, मालिकेपूर्वी भारताला एक दणका बसला आहे तो प्रमुख तेज गोलंदाज मोहम्मद शामीच्या (Mohammed Shami) दुखापतीच्या अपडेटचा.

शामी सध्या घोट्याच्या दुखापतीवर उपचार घेतोय. शामी या मालिकेत सहभागी होईल की नाही हे त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहे. अजून त्याने आपली तंदुरुस्ती सिद्ध केलेली नाही. आणि दुखापतीनंतर गोलंदाजीला सुरुवातही केलेली नाही.

(हेही वाचा – Mumbai Air Port Security : विमानतळाची सुरक्षा व दर्जाविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा)

३३ वर्षीय शामीची निवड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतसाठीही झाली होती. पण, तो तंदुरुस्त नसल्यामुळे त्याच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश भारतीय संघात करण्यात आला. शामीला भारतीय संघात पुनरागमनापूर्वी आधी बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत जाऊन आपली तंदुरुस्ती दाखवून द्यावी लागेल. त्यानंतरच भारतीय संघात त्याचा समावेश होऊ शकेल.

दुसरं म्हणजे बीसीसीआयही मोहम्मद शामीच्या (Mohammed Shami) कसोटी पुनरागमनाची घाई करणार नाही. कारण, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमरा संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध आहेत. आणि अशावेळी शामीने नीट विश्रांती घेऊन पूर्णपणे तंदुरुस्त झालेलंच बीसीसीआयला हवं आहे.

दरम्यान, सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याही देशांतर्गत हंगाम दुखापतीमुळे खेळू शकणार नाही आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.