Manu Bhaker : ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती मनु भाकर आणि सचिन तेंडुलकरची ग्रेट भेट

मनु भाकर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मोठी चाहती आहे.

86
Manu Bhaker : ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती मनु भाकर आणि सचिन तेंडुलकरची ग्रेट भेट
Manu Bhaker : ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती मनु भाकर आणि सचिन तेंडुलकरची ग्रेट भेट
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरी कांस्य पदक जिंकणारी मनु भाकर (Manu Bhaker) सध्या मुंबई दौऱ्यावर आहे. आणि तिथे तिने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) सदिच्छा भेट घेतली. ‘एकमेवाद्वितीय सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सर!’ असं मनुने सचिनबरोबरचे फोटो ट्विटरवर शेअर करताना म्हटलं आहे. ‘दिग्गज क्रिकेटपटूला भेटून मला मला खूप आनंद झाला आहे. हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. त्यांच्या क्रिकेटमधील प्रवासामुळे मला प्रेरणा मिळाली आहे. आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याचं बळही त्यांच्या अनुभवातून मला मिळालं आहे,’ असं मनुने संदेशात लिहिलं आहे. या अविस्मरणीय आठवणींसाठी मनुने सचिनचे आभारही मानले आहेत.

(हेही वाचा – झोपडपट्ट्यांच्या बाजूला असणाऱ्या महाविद्यालयांतील महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी काय केले? Bombay High Court कडून राज्य सरकारकडे विचारणा )

मनुबरोबर तिचे पालकही होते. मनुने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सचिनची पत्नी अंजली तेंडुलकरही दिसत आहे.

(हेही वाचा – ‘Emergency’ चित्रपटावर बंदी येणार? सेन्सॉर बोर्डाच्या लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या, कंगना म्हणाली…)

नुकत्याच संपलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरने (Manu Bhaker) इतिहास रचताना एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकण्याचा मान मिळवला. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय आहे. १० मीटर एअर पिस्तुलच्या महिला एकेरी आणि मिश्र स्पर्धेत तिने कांस्य पदक जिंकलं. मिश्र दुहेरीत सरबज्योतच्या साथीने तिने पदक जिंकलं. याशिवाय २५ मीटर पिस्तुल प्रकारातही ती चौथी आली. त्याचबरोबर ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली महिला नेमबाज आहे. या पदक विजेत्या कामगिरीनंतर मनूला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) त्यांच्या निवासस्थानी बोलावलं होतं. तर इतर मान्यवरही तिला घरी बोलवून तिचं कौतुक करत आहेत. सध्या ती मुंबई दौऱ्यावर आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.