M S Dhoni : आयपीएलमधून कॅप्टन कूल घेणार निवृत्ती? ‘या’ व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

33 सेकंदाच्या या इमोशनल व्हिडीओनंतर पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे.

188
M S Dhoni : आयपीएलमधून कॅप्टन कूल घेणार निवृत्ती? 'या' व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

भारतीय क्रिकेट विश्वात कॅप्टन कूल अशी आपली वेगळी ओळख निर्माण करणारा महेंद्र सिंग धोनी (M S Dhoni) लवकरच आयपीएलमधून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सीएसकेने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे या चर्चेला उधाण आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून धोनीची (M S Dhoni) आयपीएलमधून निवृत्ती हा विषय चवीने चघळला जात आहे. आयपीएलचे २०२१ चे सत्र चेन्नईने आपल्या नावावर केले. तेव्हापासूनच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र स्वतः धोनी किंवा चैन्नईकडून याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा झालेली नाही.

यंदाच्या आयपीएल सत्रात चेन्नईने विजय मिळवल्यानंतर धोनीच्या (M S Dhoni) निवृत्तीबद्दल त्याला विचारण्यात आले. धोनीने त्यावर आपल्या स्टाईलने उत्तर देत या चर्चेला पूर्णविराम दिला. पण आता चेन्नईने आपल्या अधिकृत खात्यावर धोनीचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. 33 सेकंदाच्या या इमोशनल व्हिडीओनंतर पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे.

(हेही वाचा – क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाला ‘युवकां’चे वावडे; ‘युवा’ खेळाडूंना ५ टक्के आरक्षण नाकारले)

13 जून 2023 रोजी सायंकाळी चेन्नई सुपर किंग्स संघाने ट्विटवर धोनीचा (M S Dhoni) स्पेशल व्हिडीओ पोस्ट केला. 33 सेकंदाच्या या व्हिडीओत धोनीचे यंदाच्या हंगामातील खास क्षण दाखवण्यात आले आहेत. हा व्हिडीओ अल्पावधीत व्हायरल झालाय. त्यानंतर धोनी निवृत्त होणार का? असा सवाल चाहत्यांना पडलाय. सोशल मीडियावर तशी चर्चाही सुरु आहे.

आयपीएलनंतर गुडघ्यावर शस्त्रक्रिया

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात धोनी (M S Dhoni) दुखापत झाली होती. गुडघ्याच्या दुखापतीनंतरही धोनी आयपीएलमध्ये खेळत होता. आयपीएलच्या सोळाव्या हंगामानंतर धोनीने मुंबईमध्ये शस्त्रक्रिया केली. मोहम्मद कैफ याने विमानतळावरील धोनीसोबतचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. दुखापतीमुळे धोनी आयपीएलच्या सोळाव्या हंगामात फलंदाजी करायला शेवटी येत होता. आयपीएल संपताच धोनीने गुडघ्याचे ऑपरेशन केले, ते यशस्वी झालेय. धोनीची प्रकृती सध्या चांगली आहे.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.