M S Dhoni : महेंद्र सिंग धोनीने म्हटलं अमिताभ बच्चनचं गाणं, चाहते म्हणाले वन्स मोअर

‘मै पल दो पल का शायर हू’ हे धोनीचं सगळ्यात आवडतं गाणं आहे आणि अलीकडेच त्याने ते जाहीररित्या म्हटलं. त्याच्या गाण्यावरही चाहते फिदा आहेत आणि आणखी एका गाण्याची फर्माईश करत आहेत.

116
M S Dhoni : महेंद्र सिंग धोनीने म्हटलं अमिताभ बच्चनचं गाणं, चाहते म्हणाले वन्स मोअर
M S Dhoni : महेंद्र सिंग धोनीने म्हटलं अमिताभ बच्चनचं गाणं, चाहते म्हणाले वन्स मोअर
  • ऋजुता लुकतुके

‘मै पल दो पल का शायर हू’ हे धोनीचं सगळ्यात आवडतं गाणं आहे आणि अलीकडेच त्याने ते जाहीररित्या म्हटलं. त्याच्या गाण्यावरही चाहते फिदा आहेत आणि आणखी एका गाण्याची फर्माईश करत आहेत. (M S Dhoni)

माजी क्रिकेट कर्णधार महेंद्र सिंग धोनीने अनेकदा अमिताभ बच्चन यांचं ‘मै पल दो पल का शायर हू,’ हे गाणं त्याचं सगळ्यात लाडकं असल्याचं सांगितलं आहे. अगदी त्याची निवृत्ती जाहीर करताना आणि सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्याने हेच गाणं मैदानात सगळ्यांना ऐकवलं होतं. (M S Dhoni)

आता हेच गाणं एका कार्यक्रमात मंचावर जाऊन धोनी गायला आहे. म्हणजे खरंतर गुणगुणला आहे आणि त्याचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झालाय. (M S Dhoni)

(हेही वाचा – Mahad Fire : ७ मृतदेह बाहेर काढण्यात यश; ४ अजून बेपत्ता)

मुलाखतकाराने धोनीला विचारलं, ‘खेळाची ती भूक अजून जिवंत आहे का? जर नसेल तर सध्या तुला आयुष्यात काय महत्त्वाचं आहे?’ त्यावर धोनीने त्याच्या स्वभावानुरुप उत्तर दिलं आहे. ‘मला चांगला क्रिकेटपटू म्हणून लोकांनी लक्षात ठेवावं अशी माझी इच्छा कधी नव्हतीच. चांगला मनुष्य ही माझी ओळख राहावी असं मला वाटतं,’ असं धोनी यावर म्हणाला. (M S Dhoni)

म्हणूनच त्याला अमिताभ यांचं हे गाणं आवडतं. त्याचं हे गाणे आणि त्याने दिलेलं उत्तर यामुळे चाहते बेहद खुश झाले आहेत आणि त्यांनी धोनीला शुभेच्छाही दिल्या आहेत. (M S Dhoni)

जॉन्स यांचं ट्विट रिट्विट करत अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘म्हणूनच धोनी आम्हाला आवडतो,’ असं एका चाहत्याने लिहिलंय. तर अनेकांनी ‘धोनी आमचा लाडका आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. (M S Dhoni)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.