Lionel Messi : अखेर टोकियोतील प्रदर्शनीय सामन्यात मेस्सी खेळला

आधीच्या हाँग काँगमधील सामन्यात मेस्सी न खेळल्यामुळे ४०,००० प्रेक्षकांनी राग व्यक्त केला होता. 

147
Lionel Messi : अखेर टोकियोतील प्रदर्शनीय सामन्यात मेस्सी खेळला
  • ऋजुता लुकतुके

अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू आणि अमेरिकन क्लब इंटर मिलानशी करारबद्ध असलेला लायनेल मेस्सी (Lionel Messi) अखेर गुरुवारी टोकियोमधील प्रदर्शनीय सामन्यात अर्धा तास खेळला. जपानचा एक क्लब व्हिसेल कोबे बरोबरचा हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. पण, निदान प्रेक्षकांना मेस्सीचा (Lionel Messi) खेळ पाहता आला. आणि अर्ध्या तासांच्या मैदानातील वावरात मेस्सीने आपल्या खेळाची छापही उमटवली. (Lionel Messi)

या आधी हाँग काँगमधील सामन्यात मेस्सी (Lionel Messi) खेळला नव्हता. त्यामुळे त्याचा खेळ बघण्यासाठी मैदानावर जमलेल्या ४०,००० प्रेक्षकांनी मेस्सी आणि इंटर मियामी संघाचा सहमालक डेव्हिड बेकहम यांची हुर्यो उडवली होती. आयोजकांकडे हाँग काँग सरकारने जाब विचारला. आणि आयोजकांना सामन्याच्या आयोजनासाठी सरकारकडून मागितलेलं अनुदान परत करावं लागलं. (Lionel Messi)

इंटर मियामी संघाचा पेनल्टी शूट-आऊटवर ३-४ असा पराभव झाला. पण, मैदानावर जमलेल्या २८,६१४ प्रेक्षकांना निदान मेस्सीचा (Lionel Messi) खेळ तरी पाहायला मिळाला. तो खेळायला उतरेपर्यंत लोकांनी मेस्सी या एकाच नावाचा जयघोष सुरू ठेवला होता. (Lionel Messi)

(हेही वाचा – Microsoft to Train Indian Women : मायक्रोसॉफ्ट कंपनी ७५,००० महिलांना देणार डेव्हलपिंगचं प्रशिक्षण)

या तारखेपासून मेजर सॉकर लीगला सुरुवात

पहिल्या हाफमध्ये मेस्सी (Lionel Messi) मैदानावर उतरला नाही. पण, सामन्याच्या ७० व्या मिनिटाला डेव्हिड रुईझचा बदली खेळाडू म्हणून मेस्सी मैदानात आला. आणि प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष झाला. लगेचच ७९व्या मिनिटाला त्याने एकट्याने एक चाल रचून चेंडू जवळ जवळ गोलजाळ्यापर्यंत नेला होता. पण, त्याचा हा गोलचा प्रयत्न हुकला. (Lionel Messi)

हाँग काँगमधील सामना न खेळण्यासाठी मेस्सीने (Lionel Messi) गुडघ्याची दुखापत हे कारण दिलं होतं. आपल्या ट्विटर खात्यावरून चाहत्यांची त्याने माफीही मागितली होती. पण, जपानमध्ये सामन्याच्या आदल्या दिवशी सराव करताना त्याच्या तंदुरुस्तीचा आढावा घेऊन त्याला ३० मिनिटं खेळवण्याचा निर्णय घेतल्याचं इंटर मियामी संघाचे प्रशिक्षक गेरार्डो मार्टिनो यांनी सामन्यानंतर सांगितलं. (Lionel Messi)

२१ फेब्रुवारीला अमेरिकेत मेजर सॉकर लीगला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी इंटर मियामी संघ अर्जेंटिनातील न्यूवेल ओल्ड बॉयज् या क्लब विरुद्ध आणखी एक प्रदर्शनीय सामना खेळणार आहे. (Lionel Messi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.