Kushti News : आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत युवा कुस्तीपटू उदितला रौप्य

Kushti News : उदितने या स्पर्धेत आपल्यापेक्षा तगड्या आणि अनुभवी मल्लांना धूळ चारत सगळ्याचं लक्ष वेधलं. 

93
Kushti News : आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत युवा कुस्तीपटू उदितला रौप्य
  • ऋजुता लुकतुके

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात भारताच्या उदितला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. पण, काटकपणा आणि कौशल्याच्या जोराव त्याने या स्पर्धेत त्याने आपली छाप पाडली. कारण, अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात त्याच्यासमोर आव्हान होतं ते तगडा प्रतिस्पर्धी इब्राहिम महदी खारी आणि विजेतेपदाचा प्रमुख दावेदार अलबाझ स्मॅनबेखोव यांचं. पण, या दोघांचा पराभव करत त्याने स्पर्धेत खळबळ उडवून दिली. (Kushti News)

उपांत्य फेरीच्या लढतीतही कोरियाच्या कुम योक किम विरुद्ध त्याने चांगली लढत दिली आणि मोक्याच्या क्षणी कठीण डाव टाकत विजयही ४-३ असा साध्य केला. अंतिम फेरीत त्याचा मुकाबला जपानच्या केंटो युमियाशी होता. सुरुवातीला उदित (Udit) ३-४ असा मागे पडला होता. पण, त्याने बरोबरी साधली. आणि त्यानंतर डावपेचाच्या आधारावर सामन्यात आघाडीही घेतली होती. शेवटचं एक मिनिट असताना उदितचा प्रयत्न बचावाचा होता. (Kushti News)

(हेही वाचा – Bengaluru Blast: बेंगळुरू बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएची कारवाई, पश्चिम बंगालमधून आरोपी आणि सूत्रधाराला अटक)

५७ किलो गटात २०२० पासून भारतीय संघाचं वर्चस्व

आणि नेमकी युमियाशीला उदितच्या उजव्या पायाची पकड करता आली. त्याने या पकडीने उदितला पिवळ्या रिंगणाबाहेर खेचून आणलं आणि त्याचा एक गुण कमावत त्याने उदितवर ५-४ असा विजय मिळवला. अगदी शेवटच्या क्षणी सुवर्ण उदितच्या हातून निसटलं. २०२२ पर्यंत २० वर्षांखालील स्पर्धा खेळणारा उदित ज्येष्ठ गटात चांगला स्थिरावला आहे. (Kushti News)

या स्पर्धेत ५७ किलो गटात २०२० पासून भारतीय संघाचं वर्चस्व राहिलं आहे. ऑलिम्पिक रौप्य विजेता रवी दाहिया आणि अमन सेहरावत यांनी २०२० ते २०२३ पर्यंत सलग विजेतेपदं पटकावली होती. इतर वजनी गटांतही भारतीय मल्लांची कामगिरी चांगली झाली आहे. रोहीत कुमार (६५ किलो), अभिमन्यू (७० किलो) आणि विकी (९७ किलो) यांनी आपापल्या वजनी गटांत कांस्य पदका पदकांच्या सामन्यांपर्यंत मजल मारली आहे. (Kushti News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.