- ऋजुता लुकतुके
भारताचा माजी यष्टीरक्षक किरण मोरे बीसीसीआयचा अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत सगळ्यात पुढे आहे. बीसीसीआयने पश्चिम विभागाच्या दोन माजी क्रिकेटपटूंशी अध्यक्षपदासाठी संपक केला आहे. आणि यात किरण मोरेचंच नाव आघाडीवर असल्याचं खात्रीलायकरित्या समजतंय. ‘अध्यतक्षपदाचा निर्णय एकमताने व्हावा असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच सर्व राज्य संघटनांचं मत विचारात घेतलं जात आहे. पण, यात किरण मोरे यांच्याच नावाला सर्वाधिक पाठिंबा आहे,’ असं सूत्रांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.(Kiran More Next President)
(हेही वाचा – Asia Cup 2025 : हरभजन सिंगने भारत-पाकिस्तान सामन्याला दर्शवला विरोध; नक्की काय म्हणाला ?)
बीसीसीआयमध्ये ७० वर्षं हे निवृत्तीचं वय आहे. आणि आधीचे अध्यक्ष रॉजर बिन्नी १९ जुलैला ७० वर्षांचे झाल्यावर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. आणि सध्याचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला तात्पुरता पदभार सांभाळत आहेत. पण, २८ सप्टेंबरला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदाबरोबरच कार्यकारिणीतील इतर पदांसाठीही निवडणूक होणार आहे. एक बातमी अशीही आहे की, बीसीसीआयची ही प्रस्तावित बैठक काही कारणांमुळे होऊ शकणार नाहीए. पण, उमेदवारावर एकमत झालं तर निवडणूक आणि पर्यायाने अशा सभेचीही गरज भासणार नाही. त्यामुळे एकमताने हा निर्णय घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
(हेही वाचा – Disha Patani च्या घराबाहेर गोळीबार; अनिरुद्धाचार्य यांच्याविषयी टिप्पणी करणं पडलं महागात)
किरण मोरेंचा जन्म १९६२ साली बडोद्यात झाला आहे. १९८४ ते १९९३ या कालावधीत ते भारतीय संघात यष्टीरक्षक आणि तळाला सक्षम फलंदाजी करणारे खेळाडू म्हणून खेळले. भारताकडून ते ४९ कसोटी आणि ९७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १९८८ आणि १९९१ मध्ये आशिया चषक विजेत्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. निवृत्तीनंतर किरण मोरेनं क्रिकेट प्रशासनातही आपला जम बसवला आहे. बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून दोन कार्यकाल त्यांनी काम केलं आहे. तर मुंबई इंडियन्सचे यष्टीरक्षणाचे प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत होते. सध्या क्रिकेट समालोचनात ते आपलं नशीब आजमावत आहेत.(Kiran More Next President)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

