James Anderson : ४१ वर्षीय जेम्स अँडरसनला इंग्लंडने संघातून वगळलं

James Anderson : जेम्स अँडरसनला वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळण्याची संधी देण्यात आली आहे. 

120
James Anderson : ४१ वर्षीय जेम्स अँडरसनला इंग्लंडने संघातून वगळलं
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषक संपल्यानंतर जागतिक क्रिकेटमध्ये पुन्हा कसोटीचे वारे वाहू लागले आहेत. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज ही पिहीली मालिका बुधवारपासून सुरू होत आहे. लॉर्ड्सवर होणारा हा सामना बेन स्टोक्सच्या इंग्लिश संघासाठी टी-२० विश्वचषकातील अपयश विसरायला लावणारा ठरावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर संघासाठी भावनात्मक क्षणही आहे. कारण, ४१ वर्षीय जेम्स अँडरसनचा हा शेवटचा कसोटी सामना असणार आहे. एकूण कारकीर्दीतील त्याचा हा १८७ वा कसोटी सामना असेल. (James Anderson)

अँडरसन स्वत: निवृत्तीसाठी तयार नव्हता. पण, इंग्लिश निवड समितीने त्याचं वाढतं वय पाहून निवृत्तीसाठी त्याला तयार केलं आहे. २०२४-२५ साली इंग्लिश संघ ऑस्ट्रेलियात ॲशेस मालिकेसाठी जाणार आहे. तोपर्यंत नवीन संघ बांधणी पूर्ण व्हावी यासाठी नवीन खेळाडूंना संधी देण्याचं संघ प्रशासनाचं धोरण आहे. जेम्स अंडरसनच्या कसोटी कारकीर्दीवर त्यामुळे पडदा पडणार आहे. (James Anderson)

(हेही वाचा – Worli Hit and Run Case प्रकरणी मिहीर शाहला १६ जुलैपर्यंत कोठडी)

वेस्ट इंडिज विरुद्धचा अखेरचा कसोटी सामना खेळण्याची संधी मात्र त्याला देण्यात आली आहे. तो उर्वरित दोन कसोटी सामने संघाबरोबर मार्गदर्शक म्हणून असणार आहे. (James Anderson)

खरंतर आताही अँडरसनला निवृत्त व्हायचं नव्हतं. ‘माझ्यासमोर निवृत्तीखेरिज इतर कुठला पर्यायच नाहीए. त्यामुळे उपलब्ध पर्याय मी स्वीकारायचा ठरवलंय,’ असं काहीशा निराश अँडरसनने क्रिकबझ वेबसाईटशी बोलताना म्हटलं आहे. अँडरसन पहिल्या कसोटीनंतर निवृत्त झाला की त्याची जागा घेण्यासाठी गस ॲटकिनसन, पेनिंगटन, मॅथ्यू पॉट्स आणि ख्रिस वोक्स ही फळी तयार आहे. (James Anderson)

जेम्स अँडरसन हा जगातील नावाजलेला तेज गोलंदाज असून १८७ सामन्यांत त्याने तब्बल ७०० कसोटी बळी मिळवले आहेत. तब्बल ३२ वेळा त्याने डावांत ५ बळी टिपले आहेत. (James Anderson)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.