Worli Hit and Run Case प्रकरणी मिहीर शाहला १६ जुलैपर्यंत कोठडी

78
वरळीतील हिट अँन्ड रन (Worli Hit and Run Case) प्रकरणात मिहीर शाहाला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी त्याला विरार येथून अटक करण्यात आली. बुधवारी, 10 जुलै रोजी त्याला  शिवडी न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

फक्त 15 मिनिटे फोन चालू केला, आणि… 

वरळीच्या कोळीवाड्यात बीएमडब्ल्यू या अलिशान गाडीने दुचाकीवर असलेल्या जोडप्याला उडवले. यावेळी कार चालकाने दुचाकीवरील महिलेले १ ते दीड किमीपर्यंत फरफटत (Worli Hit and Run Case) नेले, त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर वाहन चालवणारा मिहीर शाह पळून गेला होता. दरम्यान, हे प्रकरण उजेडात येताच पोलिसांनी तत्काळ तपासकार्य सुरू केले. शिंदे गटातील पालघर जिल्ह्याचे प्रमुख राजेश शाह यांचा हा मुलगा मिहीर शाह या प्रकरणात दोषी आढळला. परंतु, घटनेनंतर तो फरार होता.
अपघात झाल्यानंतर तो आधी प्रेयसीकडे, मग तिथून बोरीवलीला त्याच्या राहत्या घरी, तिथून ठाणे-शहापूर येथील रिसॉर्टवर कुटुंबीयांबरोबर लपला. त्यानंतर कुटुंबीयांनाही फसवून तो मित्रांबरोबर विरारच्या एका रिसॉर्टवर गेला. दरम्यान, या काळात सर्वांचे फोन बंद होते. त्यामुळे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. परंतु, त्याच्या मित्राने पंधरा मिनिटाकरता मिहीरचा फोन सुरू केला आणि पोलिसांनी त्यांचा माग काढत त्यांना तत्काळ अटक केली. त्याची आई, दोन बहिणीला ताब्यात घेण्यात आले असून मित्र आणि त्याला अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.