Ishan-Shreyas : इशान आणि श्रेयसवर रणजी न खेळण्यासाठी कारवाई होणार?

Ishan-Shreyas : इशान आणि श्रेयस यांनी बीसीसीआयने इशारा देऊनही आपल्या स्थानिक संघांच्या रणजी सामन्यांना दांडी मारली आहे

95
Ishan-Shreyas : इशान आणि श्रेयसवर रणजी न खेळण्यासाठी कारवाई होणार?
Ishan-Shreyas : इशान आणि श्रेयसवर रणजी न खेळण्यासाठी कारवाई होणार?

ऋजुता लुकतुके

सध्या सुरू असलेल्या रणजी हंगामात स्थानिक संघाकडून न खेळण्याचा निर्णय इशान आणि श्रेयस (Ishan-Shreyas) या दोघांनाही महागात पडू शकतो. बीसीसीआय (BCCI) लवकरच खेळाडूंबरोबरचे मध्यवर्ती करार जाहीर करणार आहे. आणि खेळाडूंच्या या यादीत इशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (shreyas iyer) यांचं नाव नसेल तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

(हेही वाचा- बाजीराव-मस्तानी, ब्लॅक, खामोशी असे भन्नाट चित्रपट बनवणारे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक Sanjay Leela Bhansali )

‘आयपीएल (IPL) नंतर सुरू होणाऱ्या नवीन हंगामासाठी निवड समितीने खेळाडूंची यादी तयार केली आहे. आणि यात ज्या खेळाडूंना बीसीसीआयचं (BCCI) मध्यवर्ती करारपत्र मिळणार अशा क्रिकेटपटूंची यादी आहे. पण, यात इशान आणि श्रेयसचं (Ishan-Shreyas) नाव वगळण्यात आलं आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं आहे. टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. (Ishan-Shreyas)

या दोघांची चर्चा गेले काही दिवस क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. इशान किशन (Ishan Kishan) डिसेंबर महिन्यात मानसिक थकव्याचं कारण देत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परत आला. तेव्हापासून तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी त्याला झारखंडकडून रणजी सामने खेळण्यासाठी आधी समज दिली. मग कडक शब्दांत त्याला इशाराही देण्यात आला. (Ishan-Shreyas)

असं असतानाही इशान झारखंड संघाबरोबर शेवटचा रणजी सामना खेळला नाही. या कालावधीत तो गुजरातमध्ये मुंबई इंडियन्सच्या सराव केंद्रावर हार्दिक पांड्याबरोबर सराव करत होता. तर श्रेयर अय्यरही (shreyas iyer) मुंबईचा शेवटाच साखळी सामना आणि शुक्रवारी बडोद्या विरुद्ध सुरू झालेला उपउपान्त्य फेरीचा सामना खेळणं अपेक्षित होतं. तसं त्याला सांगण्यातही आलं होतं. पण, श्रेयसने मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाठीच्या दुखण्यामुळे खेळण्यासाठी उपलब्ध नसल्याचं कळवलं. (Ishan-Shreyas)

तर बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीचे फिजिओ नितीन पटेल यांनी श्रेयसला कुठलीही नवीन दुखापत नसल्याचं कळवलं आहे. त्यामुळे या दोघांनीही आयपीएलला प्राधान्य देऊन रणजी करंडकाचे सामने टाळल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. आणि ही गोष्ट बीसीसीआय (BCCI) गांभीर्याने घेणार आहे.

हेही पहा-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.