IPL 2025, Vaibhav Suryavanshi : १४ व्या वर्षी आयपीएलमधील जलद शतक ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीविषयी जाणुन घ्या सर्वकाही …

राहुल द्रविडनेही व्हीलचेअरमधून उठून त्याचं कौतुक केलं.

137
IPL 2025, Vaibhav Suryavanshi : 'वैभव सुर्यवंशी रोज ४५० चेंडू खेळायचा'; प्रशिक्षकांनी सांगितली वैभवची तयारी
  • ऋजुता लुकतुके

आपला फक्त तिसरा आयपीएल सामना खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) सोमवारी २८ एप्रिल रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर (Sawai Mansingh Stadium) कहर केला. विजयासाठी २०६ धावा हव्या असताना वैभव सलामीलाच मैदानात आला. त्यानंतर त्याने षटकारांचा असा काही पाऊस पाडला की, सामन्याचा निकाल अकराव्या षटकांतच निश्चित केला. फक्त १४ वर्षांचा वैभव आयपीएलच्या इतिहासातील वयाने सगळ्यात लहान शतकवीर तर आहेच. शिवाय आणखीही डझनभर विक्रम त्याने नावावर केले आहेत.

(हेही वाचा – जलसंधारण विभाग अधिक कार्यक्षम होणार; मंत्री Sanjay Rathod यांची माहिती)

सामन्यात राजस्थान रॉयल्सनी (Rajasthan Royals) ८ गडी राखून विजय मिळवला. ११ व्या षटकातच वैभवने आपलं शतक पूर्ण केलं. आणि त्यासाठी ३५ चेंडू घेतले. त्याने तब्बल ११ षटकार आणि ७ चौकारांची आतषबाजी केली. गुजरात टायटन्सचे (gujarat titans) मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, राशिद खान, करीम जनत आणि प्रसिद्ध कृष्णासारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले गोलंदाजही वैभवसमोर निष्प्रभ ठरले.

एकीकडे हे वादळी शतक पाहून संपूर्ण क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं, तर दुसरीकडे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) देखील त्याच्या व्हीलचेअरवरून उभा राहिला आणि नाचू लागला. आयपीएलपूर्वी राहुलच्या पायाला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो संपूर्ण आयपीएलमध्ये (IPL 2025) व्हीलचेअरवर दिसला. पण वैभवची खेळी पाहिल्यानंतर तो सगळं विसरून आनंदाने उड्या मारू लागला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(हेही वाचा – Parashurama Jayanti : कधी आहे भगवान परशुराम यांची जयंती? कलियुगात कल्कीसोबत मिळून खरोखर धर्मयुद्ध करणार का?)

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2025) दुसरे सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Suryavanshi) नावावर आहे. त्याने फक्त ३५ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याच्या पुढे ख्रिस गेल (Chris Gayle) आहे, ज्याने ३० चेंडूत ही कामगिरी केली. याशिवाय, वैभव सर्वात जलद शतक करणारा पहिला भारतीय फलंदाजही ठरला. एवढेच नाही तर तो आयपीएल (IPL 2025) आणि टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाजही बनला आहे. त्याच वेळी, वैभवने षटकार मारण्यातही सर्वांना मागे टाकले. त्याने त्याच्या डावात एकूण ११ षटकार मारले. त्यानंतर सूर्यवंशी टी-२० डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय ठरला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.