IPL 2024 Virat on Pat Cummins : विराट कोहली कमिन्सला ‘तू खूप छान आहेत,’ असं का म्हणाला?

IPL 2024 Virat on Pat Cummins : हैद्राबाद विरुद्ध बंगळुरू सामन्याआधी दोन दिग्गज खेळाडूंमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. 

89
IPL 2024 RCB vs SRH : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अजोड कामगिरी
  • ऋजुता लुकतुके

सनरायझर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा एकत्र सराव सुरू असताना हैद्राबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्स फलंदाजीचा सराव आटोपल्यावर स्वत:हून विराट कोहलीकडे गेला. दोघांनी काही मिनिटं एकमेकांशी गप्पा मारल्या. शुक्रवारी दोन्ही संघ आयपीएलमध्ये (IPL) आमने सामने येत आहेत. हैद्राबादने आतापर्यंत या हंगामात तीनदा २५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर बंगळुरू संघ तळाला आहे. अशावेळी बंगळुरूला उर्वरित सर्व सामन्यांत विजय आवश्यक आहे. (IPL 2024 Virat on Pat Cummins)

खेळाडू मात्र फलंदाजीविषयी गप्पा मारताना दिसले. विराट आपला फलंदाजीचा सराव आटोपून मैदानात बसला होता. कमिन्स त्याच्याकडे जाऊन म्हणाला, ‘मी फलंदाजीने ही खेळपट्टी अगदी निर्जीव असल्याचं दाखवून दिलं आहे, असं माझे प्रशिक्षक मला सांगत होते.’ त्यावर विराट हसत हसत म्हणाला, ‘तू खूपच चांगला फलंदाज आहेस.’ दोघांमधील या हास्य विनोदांनी भरलेल्या गप्पांचा व्हिडिओ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपल्या सोशल मीडिया खात्यावर टाकला आहे. (IPL 2024 Virat on Pat Cummins)

दुसरीकडे सनरायझर्स संघानेही कोहली आणि कमिन्स एकाच वेळी फलंदाजीचा सराव करत असतानाचे व्हीडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. (IPL 2024 Virat on Pat Cummins)

(हेही वाचा – आता Supreme Court मधील याचिकांच्या सुनावण्यांचे अपडेट Whatsapp वर येणार; सर्वोच्च न्यायालयाची घोषणा)

बंगळुरू संघाने आतापर्यंत ८ सामन्यांत एकच विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावेच लागणार आहेत. तरंच त्यांना बाद फेरीची आशा धरता येईल. दुसरीकडे सनरायझर्स हैद्राबाद संघ ७ सामन्यांत ५ विजय मिळवून १० गुणांसह पहिल्या चारांत आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या आक्रमक फलंदाजीने आतापर्यंत मुंबईविरुद्ध ३ बाद २८७ आणि बंगळुरू विरुद्ध ७ बाद २६८ अशा धावसंख्या उभारल्या आहेत. (IPL 2024 Virat on Pat Cummins)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.